PMKSK Center : कोरोमंडल तर्फे पाच पीएमकेएसके केंद्रांची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच देशभरात ६०० प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांचा ऑनलाइन उद्‍घाटन सोहळा संपन्न झाला.
PMKSK Center
PMKSK CenterAgrowon

पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नुकताच देशभरात ६०० प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांचा (PM Krushi Samruddhi Center) ऑनलाइन उद्‍घाटन सोहळा संपन्न झाला. या योजनेमध्ये कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडतर्फे (Koromandal International Limited) गोंदिया, नागपूर, वाशीम, जालना, लातूर या ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. कंपनीतर्फे माती परीक्षण प्रयोगशाळा, सल्ला व मार्गदर्शन केंद्र या योजनेतील केंद्रांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकाच छत्राखाली सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत.

PMKSK Center
Crop Damage : अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात; शेतकरी कोलमडला

जालना येथे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रावर या योजनेच्या उद्‍घाटनासाठी कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे, उप सरव्यवस्थापक अरुण वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. माती परीक्षण केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण सुविधा कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडतर्फे विनामूल्य पुरविण्यात आली असल्याची माहिती जितेंद्र कोळपे यांनी दिली.

कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड तर्फे दीपानी कृषी केंद्र (तिरोडा, जि. गोंदिया), सौरभ कृषी केंद्र, (कन्हान, जि. नागपूर) अनुष्का कृषी केंद्र (वाशीम), रूपश्री सीड्स (रामनगर, जालना) आणि श्री भगवानबाबा फर्टिलायझर्स (कव्वा रोड, लातूर) येथे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी गोंदिया, नागपूर, वाशीम, लातूर, जालना भागांतील व्यापारी, शेतकरी, लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com