Karjmukti Yojana : निफाडचे पाचशे शेतकरी ‘प्रोत्साहन’पासून वंचित

Farmer Loan : नियमित कर्ज परतफेड करणारे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही शासनाच्या प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
Farmer Loan
Farmer LoanAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आतापर्यंत पाचव्या यादीनंतर सहाव्या यादीत तरी आपले नाव येईल, अशा आशेवर बसलेल्या निफाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप तरी निराशाच आहे. आतापर्यंत तालुक्यात ७ हजार ४३८ शेतकऱ्यांना ३५ कोटी २४ लाख रुपयांचे अनुदानवाटप झाले आहे.

Farmer Loan
Farmer Incentive Scheme : प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकरी ताटकळत

नियमित परतफेडीनंतरही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी महायुती सरकारने केली. जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकेचे कर्जदार असलेल्या निफाड तालुक्यात १६ हजार ५७० शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली; पण दोन वर्षे नियमित कर्जफेडीसह विविध निकषांमुळे त्यातील आठ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या नावाला शासनाने लाभ देण्यावर फुली मारली; तर सात हजार ९४४ शेतकरी पात्र ठरले. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे प्रोत्साहन अनुदान वाटपाचे काम शासनातर्फे सुरू झाले होते.

Farmer Loan
Farmer Incentive Scheme : ‘प्रोत्साहन’पासून ५५ हजार शेतकरी वंचित

त्रुटी दूर करताना आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या सहा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मृत सभासद, वारस नोंद नसणे, चुकीचा आधार क्रमांक आदी त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही स्थानिक बँकांच्या माध्यमातून करण्यात आली. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सहा याद्यांत ५०० शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. पुढील यादीत तरी आपले नाव येईल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा होत आहे. अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. वंचित शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्याची आशा आहे.

प्रोत्साहन योजनेपासून ५०० शेतकरी का वंचित आहेत, याची माहिती घेणार आहे. त्यातील त्रुटी दूर करून ५० हजार रुपयांचे अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-दिलीप बनकर, आमदार-निफाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com