Fertilizer Association Strike : खते, बियाणे कीटकनाशके डीलर असोसिएशनचा संप मागे

खत उत्पादकांकडून दुकानदारांचे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला होता.
Fertilizer Association Sump
Fertilizer Association SumpAgrowon

सातारा ः'‘जिल्हा संघटना, माफदा व ऑल इंडिया असोसिएशनच्या मुख्य दोन मागण्या मान्य झाल्याने बुधवारचा (ता. १८) संप (Fertilizer Association Strike) मागे घेण्यात आला.

इतर मागण्यांसंदर्भात विभागीय कार्यालयात कृषी आयुक्तांनी (Commissioner of Agriculture) बैठक घेतली आहे, असे जिल्हा रासायनिक खते (Chemical fertilizers), बियाणे (Seed) व कीटकनाशके डीलर असोसिएशनचे अध्यक्ष शशांक शहा यांनी सांगितले.

खत उत्पादकांकडून दुकानदारांचे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय व शासनाच्या आदेशाचे उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालकांनी दुकाने बंद ठेऊन बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या बाबत संघटनेच्या वतीने मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा कृषी अधिकारी विजय माईणकर व जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांना निवेदन दिले होते.

Fertilizer Association Sump
Hirwali Khat : हिरवळीच्या खतांचा वापर करणं फायदेशीर ठरतं ?

‘‘रासायनिक खतांसोबत होणारे लिंकिंग करणार नाही, रासायनिक खतांच्या अनुषंगाने असणारे ‘एक्स रेल’ किंवा ‘एक्स गोडाऊन’बाबतची मागणी मान्य झाली आहे, असे शहा यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com