Team Agrowon
हिरवळीच्या खतांना अनन्य साधारण महत्व आहे.
आताच्या या रासायनिक खतांच्या अमर्याद वापरा पुढे जमिनीचा पोत बिघडत आहे म्हणून बरेच शेतीतज्ञ हिरवळीच्या खतांना प्रोत्साहन देत आहेत.
रुकडी येथील शेतकरी श्री बदाम जाधव यांच्या शेतामध्ये आडसाली ऊस लागण केलेली आहे.
त्याच्यामध्ये तागाचे आंतरपीक हिरवळीच्या खताकरिता एका बाजूला सरीवर टोकणला आहे.
यासाठी त्यांना बारा किलो तागाचे बी ९०० रुपयांना मिळाले व पेरून घेण्यासाठी शेतमजुरी असा जवळपास पंधराशे रुपये खर्च आलेला आहे.
या तागापासून जवळपास तीन ट्रॉली शेणखताएवढे खत शेताला मिळणार आहे.