
Nagar Onion Market News : मध्यंतरीच्या पंधरा दिवसांचा अपवाद वगळला तरी कांद्याला गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जास्तीत जास्त पंधरा ते सतरा रुपयांपेक्षा अधिक दर नाही. साधारणपणे बहुतांश शेतकऱ्यांना आठ ते दहा रुपये किलोनेच कांदा (Onion Rate) विकावा लागला.
त्यामुळे कांदा उत्पादकांचे (Onion Producer) आर्थिक गणित बिघडले, असे सांगितले जात असले तरी पुढील काळात दर येईल या आशेने नगर जिल्ह्यात रब्बीत यंदाही विक्रमी सुमारे १ लाख ७२ हजार १४२ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत लागवड (Onion Cultivation) झाली आहे. यातही अजून वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील बहुतांश भागात कांदा पिकाला आता प्राधान्य दिले जात आहे. नगर, नाशिक, पुणे भागात सर्वाधिक कांदा लागवड होते. एकट्या नगर जिल्ह्यात गेल्यावर्षी सुमारे खरीप (पावसाळी), लेट खरीप रब्बी व रांगडा मिळून सव्वा दोन लाख हेक्टरवर लागवड झाली होती.
रब्बी व उन्हाळी मिळून जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्राचा टप्पा पार केला होता. मात्र दिवाळीच्या काळातील एक पंधरा दिवसाचा अपवाद सोडला तर गेल्या दीड वर्षापासून कांद्याला १५ ते सतरा रुपयांपेक्षा अधिक दर नाही. बियाणे, मजुरी, व अन्य खर्चाचा विचार करता हा दर पडरवडणारा नाही.
यंदा कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले असल्याचे बोलले जात असले तरी यंदाही शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसत आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ७२ हजार १४५ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.
अजूनही अनेक भागात कांदा लागवड सुरू आहे. त्यामुळे यंदाही दोन लाख हेक्टरच्या जवळपास कांदा क्षेत्र होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या कांद्याला प्रती किलो १६ रुपयांपर्यत जास्तीत जास्त दर मिळत आहे.
जवळपास दीड वर्षापासून असाच दर आहे. तरीही आता भविष्यात दरवाढ होईल या आशेने कांदा लागवड अधिक होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मोठी कांदा लागवड झाली होती, तीच स्थिती यंदाही निर्माण झाली आहे.
तालुकानिहाय कांदा
लागवड - (हेक्टर)
नगर १७,९३४
पारनेर ३१,५२८
श्रीगोंदा २६,२५४
कर्जत १५,९६६
जामखेड ५,७४४
शेवगाव ७,२४५
पाथर्डी ९,५०८
नेवासा ११,७३२
राहुरी १०,१२५
संगमनेर ९,३४९
अकोले १,२९४
कोपरगाव ११,३०२
श्रीरामपूर १०,६१२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.