Banana Export : नांदेडमधील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घ्यावे

जळगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनातील अनुभव विशद केले.
Banana Export
Banana ExportAgrowon

नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी (Banana Farmers) केळी पीक लागवड (Cultivation of Banana Crop) व त्यातील निर्यातक्षम (Banana Export) बाबींचा सूक्ष्म अभ्यास करून केळी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा, आपला सामाजिक,आर्थिक विकास साधावा.

यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल. नांदेड जिल्हा केळी निर्यातीमध्ये हब व्हावा, असा आशावाद जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

कृषी विभाग व कृषी पणन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम केळी उत्पादन व विक्री व्यवस्थापन कार्यशाळा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे शनिवारी (ता. २१) करण्यात आले होते. सदरील कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांन नांदेड जिल्ह्यातील केळी लागवड व निर्यातक्षम उत्पादनाविषयी सद्यःस्थिती, कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद करून कृषी विभागातील विविध योजना व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्व सांगितले.

जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष के. बी. पाटील यांनी केळी पिकातील उत्तम कृषी पद्धती (गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस), निर्यातक्षम केळीसाठी नवीन जाती, केळी पिकातील सिगाटोका, बंची टॉप ऑफ बनाना आदी रोगाबाबत घ्यावयाची काळजी व त्याचे नियंत्रणाविषयी माहिती देऊन राज्याची, देशाची केळी निर्यातीतील सध्यस्थिती, आपल्या देशास केळी निर्यातीमध्ये असणारा वाव, विविध देशातील लागवड पद्धती, निर्यातक्षम मालाची मानांकने, आदीबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.

Banana Export
Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

या कार्यशाळेमध्ये महादेव बर्डे - डी. जी. एम. लातूर यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी माहिती दिली. बी. एम. डेंगळे – नेचर एक्सपोर्ट सोलुशन ॲण्ड बनाना एक्स्पर्ट यांनी केळी निर्यातीतील संधी व अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले.

बाळासाहेब खेमनार यांनी उत्तम कृषी पद्धती तज्ञ, संगमनेर यांनी केळी पिकासाठी उत्तम कृषी पद्धती प्रमाणपत्र कसे मिळवायचे याविषयी माहिती दिली.

जळगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनातील अनुभव विशद केले.

नांदेड जिल्ह्यातील बारड येथील केळी निर्यातदार नीलेश देशमुख यांनी निर्यातीमधील संधी, अडचणी, घ्यावयाची काळजी आणि शासन स्तरावरून होणारी मदत याविषयी माहिती दिली. केळी पिकावरील माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com