Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

खानदेशात प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी केळी आवक होत असून आवक स्थिर आहे. आवकेत मागील १० ते १२ दिवसांत हळूहळू घट होताना दिसून येत आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः खानदेशात प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी केळी आवक (Banana Rate) होत असून आवक स्थिर आहे. आवकेत मागील १० ते १२ दिवसांत हळूहळू घट होताना दिसून येत आहे. दरही (Banana Rate) प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपयांपर्यंत स्थिर आहेत.

रावेर, मुक्ताईनगर, यावल भागातील पिलबाग व जळगाव, भडगाव, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा भागातील जुनारी, पिलबाग केळीतून केळीची काढणी (Banana Harvesting) सुरू आहे. केळीची आवक फेब्रुवारीअखेर वाढेल. कारण सध्या खानदेशात केळीबागा (Banana Orchard) हव्या तशा काढणीवर नाहीत.

Banana Market
Banana Market : केळीचे दर दबावातच

मागील दोन महिने केळीची आवक कमीच आहे. केळीचा तुटवडा असल्याने खरेदीदारांना गावोगावी जाऊन आपला खरेदी लक्ष्यांक पूर्ण करावा लागत आहे. मागील हंगामात जानेवारीत केळीची आवक बऱ्यापैकी होती. तसेच दरही ३०० ते ७०० रुपये व सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल होते.

परंतु यंदा किमान दरही ८०० रुपयांखाली नाहीत. दर्जेदार पिलबाग केळी चोपडा, भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर भागात उपलब्ध आहे. आवकेत पुढील २० ते २५ दिवसांनंतर हळूहळू वाढ होईल.

Banana Market
Banana Market : खानदेशात केळी आवकेत घट

थंडीमुळे केळी पक्व होण्यास वेळ लागत आहे. तसेच केळी बागांचे व्यवस्थापन करण्यासंबंधी खर्चही अधिक लागत आहे. कारण मध्यंतरी अनेक दिवस खानदेशात किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली होते. थंडीची समस्या बागांमध्ये तयार झाली आहे. बागांचा दर्जा राखण्यासंबंधी शेतकरी कार्यवाही करीत आहेत.

जशी तापमानात वाढ होईल, तशी केळी आवकही वाढेल, असे संकेत आहेत. सध्या केळीला उत्तर भारतात कमी मागणी आहे. राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, छत्तीसगड येथे काही खरेदीदार केळीची पाठवणूक करीत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळीची आवक प्रतिदिन १२० ट्रक अशीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com