Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे

Latest Agriculture News : मुख्यत: किडी आणि रोगासाठी प्रतिकारक वाण आहे. मूग, उडीद पेरल्याने पिकांची फेरपालट होते. जमिनीचा पोत सुधारतो. रोगास अटकाव होतो.
Organic Farming
Organic Farming Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : परंपरागत कडधान्याचा पेरा वाढवून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कडधान्य शास्त्रज्ञ डॉ. सुहास लांडे यांनी केले. ते येथील कृषी संशोधन केंद्राच्या उडीद पिकाच्या परिक्षेत्र पाहणीदरम्यान बोलत होते.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेती आता काळाची गरज

याप्रसंगी मध्य विदर्भ विभागाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ येथील सहयोगी संचालक, शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार, प्रभारी अधिकारी डॉ. एस. लाटकर, कडधान्य शास्त्रज्ञ डॉ. सुहास लांडे, जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी व्ही. एल. कुंटावार, डॉ. संदीप कदम, महाबीजचे कृषी क्षेत्रीय अधिकारी पी. पी. भागवत, डी. एल. राठोड, वंदना जाधव, अमित सुरपाम आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. लांडे म्हणाले, की ‘पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड’ हे सर्वाधिक उत्पादन देणारे उडदाचे वाण आहे. हेक्टरी १२ ते १४ क्विंटल उत्पन्न घेता येते.

Organic Farming
Organic farming : नगरमध्ये होणार १८५० किसान समृद्धी केंद्रे

मुख्यत: किडी आणि रोगासाठी प्रतिकारक वाण आहे. मूग, उडीद पेरल्याने पिकांची फेरपालट होते. जमिनीचा पोत सुधारतो. रोगास अटकाव होतो. खर्चात बचत होते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे वाण वापरावे.

शक्य झाल्यास चांगले शेणखत, वनस्पतिजन्य झाडांचा अर्क, बैलजोडीने आंतमशागत करावी, किडींचे व्यवस्थापन करताना फेरोमन ट्रॅप, चिकट सापडे लावणे, हिरवळीचे खत वापरणे आदी उपाय करावेत. जैविक खते वापरावीत, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, यामुळे जमिनीचे आरोग्य राखले जाईल.

उशिरा पेरलेल्या उडीद, मूगावर ‘भुरी रोग’ येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी नुकसान होण्यापूर्वीच बुरशीनाशकांची फवारणी करावी.
-डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, मध्य विदर्भ, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com