Organic farming : नगरमध्ये होणार १८५० किसान समृद्धी केंद्रे

Kisan Samrudhhi Kendra : शेतकऱ्यांना खते, बियाणे, फवारणी वापर, शेतीतील खर्च कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी नगर जिल्‍ह्यात १८५० केंद्रे सुरू होणार आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Nagar News : शेतकऱ्यांना शेतीशी संबधित सर्व निविष्‍ठा आणि सेवा एकत्रिपणे मिळाव्यात पारंपरिक खतांबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांची वाटचाल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून संपूर्ण देशात पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे सुरू करण्‍यात आली आहेत.

शेतकऱ्यांना खते, बियाणे, फवारणी वापर, शेतीतील खर्च कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी नगर जिल्‍ह्यात १८५० केंद्रे सुरू होणार आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी फायदा होणार आहे. राज्यात अशी चौदा हजार केंद्रे होणार आहेत.

शेतकऱ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन व्हावे यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे सुरू केली जात आहेत. राज्यात १४ हजार तर नगर जिल्ह्यात १८५० केंद्रे सुरू केली जाणार असून त्यातील पाचशे दहा केंद्रे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली आहेत.

ही केंद्रे शेतकऱ्यांसाठी एक स्‍टॉकशॉप म्‍हणून काम करीत आहेत. एकाच छताखाली वाजवी किमतीत खते, बियाणे, कीटकनाशके आणि दर्जेदार कृषी निविष्‍ठा उपलब्‍ध करून देण्‍याबरोबरच माती परीक्षण, बियाणे आणि खते चाचणीची सुविधा या केंद्रांशी जोडल्‍या गेलेल्‍या आहेत.

Indian Agriculture
Organic Farming : सेंद्रिय खत निर्मितीतून सेंद्रिय शेतीला चालना

या केंद्रांच्या माध्यमातून खतांच्या वापरास प्रोत्साहन, संतुलित खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेकडे शेतकऱ्यांना वळविणे हे मोठे काम होणार आहे.

शासकीय कृषी योजनांची माहिती देण्‍याचे काम केंद्रांतून यशस्‍वीपणे सुरू होईल. शेतकऱ्यांना उत्पादनापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत प्रशिक्षित करणे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यास या केंद्राची मोठी मदत होईल.

Indian Agriculture
Organic Farming : सेंद्रिय उत्पादनासह यशस्वी विक्री व्यवस्था

नगर जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्यांत १ हजार ८५० केंद्र कार्यान्वित होत असून, यापैकी ५१० केंद्रांचे उद्‍घाटन स्‍थानिक पातळीवर मान्‍यवरांच्‍या आणि शेतकऱ्यांच्‍या उपस्थितीत करण्यात आले. या केंद्रांच्‍या माध्‍यमातून शेतकऱ्यांना कृषी योजनांशी जोडून घेणे, योजनांचा लाभ मिळवून देणे याबरोबरीने कृषी क्षेत्रातील बदलांबाबत योग्‍यतो संवाद कृषितज्ज्ञांच्या माध्यातून साधता येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

तालुकानिहाय होणाऱ्या केंद्रांची संख्या

अकोले ः १२७, जामखेड ः ७४, कर्जत ः १५५, कोपरगाव ७० नगर १३५, नेवासा ः १६५, पारनेर १२६, पाथर्डी ः १३३, राहाता ः १३७, राहुरी ः ९२, संगमनेर ः २३२, शेवगाव ः १११, श्रीगोंदा ः १८८, श्रीरामपुर ः ८२

पंतप्रधान किसान किसान समृद्धी केंद्रे शेतकऱ्यांसाठी एक स्‍टॉकशॉप म्‍हणून काम करीत आहेत. एकाच छताखाली वाजवी किमतीत खते, बियाणे, कीटकनाशके आणि दर्जेदार कृषी निविष्‍ठा उपलब्‍ध करून देण्‍याबरोबरच माती परीक्षण, बियाणे आणि खते चाचणीची सुविधा या केंद्रांशी जोडल्‍या गेलेल्‍या आहेत. शासनाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने ही केंद्रे फायदेशीर ठरणार आहेत.
- राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, नगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com