Chana Procurement : तेल्हारा तालुक्यात चार वर्षांपासून अडकले शेतकऱ्यांचे पैसे

Chana Payment शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी शासन पुढाकार घेत असते. मात्र, तेल्हारा खरेदी विक्री संस्थेने २०१९-२० मध्ये हरभरा खरेदी करून त्याचे पैसेच शेतकऱ्यांना दिले नसल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत.
Chana
Chana Agrowon

Akola News : जिल्ह्यातील तेल्हारा खरेदी विक्री संस्थेत २०१९-२० मध्ये ‘नाफेड’ने हरभरा खरेदी केली होती. मात्र तत्कालीन अध्यक्षांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील २८ शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही अडकलेले आहेत. याविषयावर नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेतला असून बुधवारी (ता. १७) आयोजित सभेत संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी शासन पुढाकार घेत असते. मात्र, तेल्हारा खरेदी विक्री संस्थेने २०१९-२० मध्ये हरभरा खरेदी करून त्याचे पैसेच शेतकऱ्यांना दिले नसल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत.

गेल्या चार वर्षांपासून २९५ क्विंटल हरभऱ्याचे पैसे मिळालेले नाहीत. नोंदणी न झाल्याने हा हरभरा शेतकऱ्यांना परत द्यायचा होता; परंतु हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना त्‍यांच्या मालाचा मोबदला मिळू शकला नाही.

Chana
Chana Production : केंद्र सरकारच्या धोरणामुळे हरभरा उत्पादकांची गोची

हरभरा विक्रीचे ऑडिट झाले; त्याचा अहवाल सहायक निबंधक कार्यालयात पडून आहे. गेल्या महिन्यात खरेदी विक्री संस्थेची निवडणूक पार पडली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना हरभऱ्याचे प्रलंबित पैसे परत देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे याबाबत बुधवारी खरेदी विक्री संघाच्या मासिक सभेत या विषयावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Chana
Chana Procurement : हमीभावातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढले

ज्या शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संस्था अंतर्गत नाफेडला हरभरा मोजणी करून दिला, त्या शेतकऱ्यांनी दुपारी तीन वाजता खरेदी विक्री कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन खरेदी विक्री संचालक विठ्ठलराव खारोडे, शिवहरी काळे, अनंत अहेरकर, वैशाली खारोडे यांनी केले आहे.

या शेतकऱ्यांचे अडकले पैसे

मनोज बळीराम नेमाडे, आबादेवी सावरमल, चंदाबाई बाजोड, मो. दानिश मो. अफजल, प्रकाश अवताडे, पंजाबराव अरुडकार, गोदावरी मल्ल, धैर्यधुंर अवताडे, संजय काकड, महादेव फोकमारे, प्रमोद राठी, मुकुंद राठी, जयवंत अवचार, अभिजित वाघ, मनचला फसाले, अनिल अवताडे, पुरुषोत्तम इंगळे, गोविंद पाडिया, कार्तीकेष मोहोड, संतोष पाथ्रीकर, राजेश बुरघाटे, आकाश राऊत, नीलिमा वाघ, विठ्ठल महल्ले, निखिल दौड, नरेंद्र डागंरा, केशव वाघ, उदयसिंह चव्हाण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com