Umesh Deshmukh News : देवस्थान, इनाम वर्ग तीनच्या शेतकऱ्यांनी संघटित व्हावे

Kisan Sabha Update : किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांचे मत
Kisan Sabha
Kisan Sabha Agrowon
Published on: 
Updated on: 

Pune latest News : ‘‘अखिल भारतीय किसान सभेने अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांना संघटित करून लोकशाही लढ्याच्या मार्गाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.

इतर इनाम वर्ग खालसा करून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे ज्याप्रकारे जमिनी करण्यात आल्या, तशाच इनाम वर्ग ३ खालसा करून पिढ्यांपिढ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना या जमिनी मिळाव्यात, अशी मागणी किसान सभेने सरकारकडे केली आहे.

त्या न मिळाल्यास इनाम वर्गातील शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज आहे,’’ असे मत किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील, देवस्थान, इनाम वर्ग तीनचे शेतकरी यांचा जिल्हास्तरीय मेळावा पुणे शहरात नुकताच झाला. या वेळी किसान सभेचे माजी जिल्हा अध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, जिल्हा उपाध्यक्ष, कॉ. महेंद्र थोरात, खेड तालुकाध्यक्ष किसनराव ठाकूर, आयुब इनामदार, इम्रान इनामदार, अली सय्यद, खुशरोद्दीन मुजावर, मोहन घुटे, डॉ. जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Kisan Sabha
Crop Insurance : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

देशमुख म्हणाले,‘‘राज्यात देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी हजारो शेतकरी पिढ्यांपिढ्या कसत आहेत. मंदिर, मस्जिद, मठ, दर्गा अशा विविध प्रकारच्या देवस्थानांची पूजाअर्चा, दिवाबत्ती करणे, देखभाल करणे याकरिता राजेरजवाड्यांच्या काळात या कुटुंबांना जमिनी इनाम दिल्या आहेत.

स्वातंत्र्यानंतर शासनाने इतर सर्व प्रकारची इनामे खालसा केली, परंतु इनाम वर्ग ३ मात्र खालसा न केल्याने अद्यापही या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे होऊ शकल्या नाहीत.

यामुळे शेतकऱ्यांना पीककर्जासह शेतीवर मिळणाऱ्या विविध सरकारी योजना आणि अनुदाने मिळू शकत नाहीत. शेतीपिकांचे नुकसान झाले तर त्याची मदत मिळत नाही.’’

Kisan Sabha
Climate Change : हवामान बदल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज

नुकतेच किसान सभेच्या नेतृत्वात खाली दोन मोठे लॉंग मार्च झाले. यावेळी बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांनी या संदर्भात कायदा करून लवकरच या जमिनी शेतकऱ्यांना देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. कायदा करताना, कायद्याच्या मसुद्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.