Farmers Protest : अकोल्यातील शेतकऱ्यांचे आजपासून मुंबईत उपोषण

NABARD Crop Loan : मालोकार यांनी शासनाला दिलेल्या निवेदनानुसार, केसीसी योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत बदल करण्यासाठी व इतर महत्त्वाच्या विषयावर न्याय मिळावा, या साठी वारंवार पाठपुरावा केला आहे.
NABARD
NABARDAgrowon
Published on
Updated on

Akola News : शेतकऱ्यांना सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी ‘नाबार्ड’ने सुरू केलेल्या सुधारित केसीसी योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत बदल करणे व इतर मागण्यांसाठी आजपासून (ता. ३१) जिल्ह्यातील शेतकरी सुधाकर मालोकार व इतर हे विधी मंडळासमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत.

मालोकार यांनी शासनाला दिलेल्या निवेदनानुसार, केसीसी योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत बदल करण्यासाठी व इतर महत्त्वाच्या विषयावर न्याय मिळावा, या साठी वारंवार पाठपुरावा केला आहे. २०१५ पासून मागणी प्रलंबित आहे. या मागणीकडे केंद्र व राज्य शासन नाबार्डचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले जात आहे.

NABARD
Crop Loan : कपाशी, तूर, मूग, ऊस पिकाच्या कर्जदारात वाढ

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे व केवळ अंमलबजावणी पद्धती बदलण्यामुळे हिताचे होऊनही अनार्थिक असलेले प्रश्न शेतकऱ्यांनी २०१२ पासून केंद्र व राज्यशासन आणि ‘नाबार्ड’कडे मांडले आहेत. त्यावर वारंवार पत्रव्यवहार करून सनदशीर मार्गाने शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

NABARD
Crop Loan : यवतमाळमध्ये शेतकरी कर्जापासून वंचित ; ठाकरे गटाचे आंदोलन

...या आहेत मागण्या

शेतीमालास स्थानिक बाजारपेठेत उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा.

सहज सुलभ कोणताही खर्च नसलेले वित्तीय साहाय्य व्हावे.

पीक कर्जावर मिळणारे व्याज सवलत राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे सरळ केसीसी खात्यामध्ये जमा करावे.

किसान क्रेडीट कार्ड आधार क्रमांकाशी लिंक असावे.

पीक कर्जाप्रमाणेच इतर मुदती कर्जावर देखील व्याज अनुदान मिळावे.

दरवर्षी शासन मालकीच्या एकाच कंपनीमार्फत शेतीमालाचा विमा काढावा.

शेतकऱ्यांना खतावर व इतर दिली जाणारी अनुदाने डीबीटी एल योजनेमार्फतच द्यावी.

शासनाकडून कर्जमाफी, व्याजमाफी देण्याऐवजी कायमस्वरूपी अनुदान मिळावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com