Lemon Market : अकोट तालुक्यात लिंबू पिकाकडे पाठ

लिंबाला मागील तीन ते चार वर्षांत पुरेसे दर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Lemon
LemonAgrowon
Published on
Updated on

उमरा, जि. अकोला ः अकोट तालुक्यातील या परिसरात पूर्वी लिंबाच्या बागा (Lemon Orchard) मोठ्या प्रमाणात लागवडीकडे (Lemon Cultivation) कल होता. आता मात्र पुरेसे दर (Lemon Rate) मिळत नसल्याने लिंबू उत्पादनाकडे शेतकरी पाठ फिरवू लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर या बागा तोडणे सुरू केले आहे.

लिंबाला मागील तीन ते चार वर्षांत पुरेसे दर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लिंबाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी झाडावरच लिंबू सोडत आहेत. पिकलेल्या लिंबाचा सडा पडलेला आहे.

Lemon
Lemon : अकोला जिल्ह्यात रुजतेय लिंबाचे हस्त बहर तंत्र

लिंबू हे पीक कागदी व बारमाही उत्पन्न असणारे फळवर्गीय पीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाला मागणी असते. त्या उद्देशाने उमरा मंडळात सिंचन सोय असलेल्या शेतकऱ्यांनी लिंबू लागवडीकडे लक्ष केंद्रित केले होते. आता बाजारभाव अल्प मिळत असल्याने लिंबे शेतातच पडून असल्याचे दिसून येते. मजुरांकडून लिंबू तोडणेही सध्या महाग झालेले आहे.

Lemon
Lemon : हस्त बहराचे योग्य नियोजन करणे आवश्‍यक

लिंबे तोडली तर शेतकऱ्यांना आपल्या खिशातून मजुरी चुकवण्यासारखी स्थिती आहे. उमरा मंडळातील शेतकऱ्यांना लिंबासाठी केवळ अकोट ही बाजारपेठ आहे.

बाजापेठेतील व्यापारी आणि दलाल विविध शुल्क कर आकारणी करून पिळवणूकही करीत आहेत. लिंबू पिकावर केलेला खर्चही सध्या निघत नसल्याने शेतकरी पिकाकडे पाठ फिरवू लागले आहेत.

बाजारपेठेत अत्यंत कमी भाव मिळत असल्याने लिंबू तोडही महाग झाली आहे.

- मुन्ना इंगळे, लिंबू उत्पादक, उमरा

सतत पडणारे बाजारभाव आणि वाहतूक खर्चदेखील लिंबू बागेतून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे लिंबाच्या पिकाला कायमचा निरोप दिला.

- किशोर झगडे, शेतकरी, उमरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com