E Pik Pahani : तलाठ्यांकडील पीकपेऱ्याच्या मागणीमुळे शेतकरी अडचणीत

शेतीमालाची साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना समस्या
E Pik Pahani
E Pik Pahani Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः ई-पीक अॅप पाहणीद्वारे (E Pik Pahani) पीकपेऱ्यांची (Pikpera) नोंद केलेला सात-बारा (Satbara) ग्राह्य धरण्यास वखार महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. तलाठ्यांकडील पीकपेरा प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. तलाठी पीकपेरा प्रमाणपत्र देत नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वखार महामंडाळाच्या गोदाम शेतीमालाची साठवणूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

E Pik Pahani
Cotton Production : देशात कापूस उत्पादकता सुधारण्याचे संकेत

पीकपेऱ्याच्या अचूक नोंदीसाठी राज्यात ई-पीकपाहणी प्रकल्प राबविला जात आहे. परंतु त्याबाबत वखार महामंडळ आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. सध्या सोयाबीनचे बाजारभाव कमी झाले आहेत. आगामी काळात बाजारभावात तेजीच्या अपेक्षेने अनेक शेतकरी वखारच्या गोदामात सोयाबीनची साठवणूक करत आहेत. अनेक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतीमाल तारण कर्ज घेण्यासाठी वखार महामंडाळाच्या गोदामात शेतीमाल साठवणूक करण्यास इच्छुक आहेत. शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामात शेतीमाल साठविल्यास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येते. त्यासाठी सात-बारा उताऱ्यावर साठवणुकीस आणलेल्या शेतीमालाच्या पेऱ्याची नोंद आवश्यक आहे.

E Pik Pahani
Soybean Stock Limit : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले

ई-पीकपाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या पीकपेऱ्याची नोंद शेतकऱ्यांच्या खातेक्रमांकसह सात-बारा उताऱ्यावर होत आहे. ही नोंद मोबाईल अॅपद्वारे घेण्यात आलेली आहे, अशी टीप सात-बारा उताऱ्याच्या अखेरीस येत आहे. अशा प्रकारची नोंद म्हणजे शेतकऱ्यांनी स्वयंघोषित पीकपेरा केल्यासारखेच आहे. त्यामुळे संबंधित तलाठ्यांनी दिलेले पीकपेरा प्रमाणपत्र आणण्यास शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. तलाठ्यांनी हस्तलिखित पीकपेरा प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडणची वाढल्या आहेत. परभणी येथील वखार महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापकांनी ई-पीकपेरा नोंद ग्राह्य धरला जाणार नाही, असे साडेगाव, वडगाव सुक्रे, मिरखेल, धारासूर येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया ...
सोयाबीनचे बाजारभाव कमी आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतीमाल तारण घ्यायचे आहे. परंतु ई-पीकपेरा असलेली सात-बारा स्वीकारत नाहीत. तलाठ्याकडील पीकपेऱ्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे अडचण झाली आहे.
- नीतेश सुक्रे, वडगाव सुक्रे, ता. परभणी
- उमेश देशमुख, मिरखेल, ता. परभणी

ई-पीकपाहणीद्वारे पीकपेऱ्याची नोंद केलेल्या सात-बारा स्वीकारण्याबाबत वखार महामंडळांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईल.
- महेश वडदकर,
निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com