Cotton Rate : कापसाच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आशा

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे प्रामुख्याने कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Aurangabad Cotton Market News : उत्पादन (Cotton Production) घटल्याने दर वाढतील या आशेवर अजूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री ऐवजी घरातच कापूस साठवून (Cotton Storage) ठेवण्याला पसंती दिली आहे. उत्पादन घटलेले असताना दरात वाढ का होत नाही हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे प्रामुख्याने कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. मराठवाड्यातील कापसाचे सरासरी क्षेत्र १२ लाख ८५ हजार २९० हेक्टर आहे.

त्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन म्हणजे जवळपास १३ लाख ६८ हजार ५५८ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. एकूण पेरणी झालेल्या क्षेत्राच्या जवळपास २८ टक्के म्हणजे सोयाबीन नंतर कापसाचे क्षेत्र मराठवाड्यात सर्वाधिक राहिले.

परंतु नैसर्गिक आपत्तीत यंदा इतर पिकांच्या उत्पादनात झालेल्या घट प्रमाणेच कापसाच्या उत्पादनालाही काही भागात ३० ते ४० टक्के तर काही भागात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत फटका बसला आहे.

Cotton Rate
Cotton Market : शेतकऱ्यांकडे अजून किती कापूस शिल्लक?

उत्पादनात घट आल्याने दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी उत्पादित सर्व कापूस एकाच वेळी विकण्याऐवजी गरजेपुरता विकून उर्वरित कापूस साठवून ठेवण्याला पसंती दिली. आजच्या घडीला विविध भागांत ५० टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंत कापसाची विक्री करण्याऐवजी साठवूनच ठेवण्याला पसंती दिली आहे.

Cotton Rate
Cotton Market: शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचं नियोजन कसं आहे? | Agrowon | ॲग्रोवन

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात कापसाची खेडा खरेदी ही ७४०० ते ७९०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

फरदड कापसाला ६५०० पासून ७४०० पर्यंत दर मिळत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. उत्पादनात घट असताना ८४०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेलेले कापसाचे दर वाढण्याऐवजी कमीच होत असल्याचे खेडा खरेदीतील दरावरून स्पष्ट होते आहे.

भाव फरकाने कापूस देणाऱ्यांचीही अडचण...

औरंगाबाद जिल्ह्यातील तिडका येथील कापूस उत्पादक ईश्‍वर सपकाळ म्हणाले, की सुरुवातीला उत्पादित कापूस शेतकऱ्यांनी भाव फरकाचा पर्याय निवडून खरेदीदारांना दिला. त्या वेळी कापसाचे दर ८४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

त्या वेळी भाव फरकाच्या करारानुसार शेतकरी त्याला पैसे हवे असतील तेव्हा असलेल्या दरात ७०० रुपये प्रतिक्विंटल कमीने पैसे घेईल असे ठरले. आताच्या घडीला दर कमी असल्याने पैसे घेतले तर त्यात आणखी ७०० रुपयांचा घाटा प्रती क्विंटल मागे सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे शेतकरी अडचणीत अडकला आहे. आपला स्वतःचा जवळपास ८० क्विंटल कापूस आपण अशा पद्धतीने दिला असून, सध्या घरात जवळपास २१० क्विंटल कापूस दर वाढतील या आशेने पडून आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com