Cotton Market : शेतकऱ्यांकडे अजून किती कापूस शिल्लक?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही यंदा कापूस लगेच विकला नाही. आजही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस आहे. अल्प भूधारक तसचं आर्थिक तंगी असलेले शेतकरीच कापूस विकत आहेत.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

पुणेः देशातील शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात कापसाचा स्टाॅक (Cotton Stock) केला. गुजरात (Gujrat), महाराष्ट्र (Maharashtra), तेलंगणा आणि कर्नाटकातील शेतकरी सध्याच्या दरात कापूस विकताना (Cotton Sell) दिसत नाहीत. सध्या कापसाचे भाव (kapus Bhav) हंगामातील निचांकी पातळीवर आहेत.

तरीही या दरात बाजारातील आवक वाढली. त्यामुळे कापूस दरावरील दबाव आणखी वाढला. बहुतेक शेतकऱ्यांनी मार्च महिन्यानंतर कापूस विक्रीचं नियोजन केले आहे. तसेच आवकेचा दबाव येऊन गेल्यानंतर कापूस दरही सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

चांगल्या दराच्या आशेने देशभरातील शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस अजून विकलेला नाही.

गुजरातमधील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापसाचा साठा केल्याचं येथील व्यापारी सांगतात. पण गुजरातमधील कापसाविषयी दोन मतं दिसतात. काहींच्या मते शेतकऱ्यांकडे साठा आहे, तर काहींच्या मते कापूस उत्पादनच कमी आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही यंदा कापूस लगेच विकला नाही. आजही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस आहे. अल्प भूधारक तसचं आर्थिक तंगी असलेले शेतकरीच कापूस विकत आहेत. गरज नसलेले शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत, असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं.

कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातही शेतकऱ्यांनी कापसाचा साठा केला. हिंदू बिजनेसलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. शेतकऱ्यांनी घरात तसेच टेरेसवरही कापूस साठवून ठेवल्याचं दिसतं.

अॅगमार्कनेटवरील आकड्यांनुसार, देशात १ ऑक्टोबर ते ६ फेब्रुवारी या काळात १२५ लाख गाठी कापूस बाजारात आला. ही आवक मागीलवर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहे. मागीलवर्षीची या काळातील आवक १९० लाख टन होती.

Cotton Market
Cotton Market: देशातील कापूस दर किती दिवस दबावात राहतील? | Agrowon

मागील हंगामात कापसाचा भाव १० हजारांच्याही पुढे गेला होता. पण सध्या बाजारातील दर ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. या दरात बहुतेक शेतकरी कापूस विकण्यास तयार नाहीत. मागील आठवडाभरात कापसाच्या दरात पुन्हा नरमाई आली होती.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये या दरातही बाजारातील कापूस आवक वाढली. यामुळं दरावरील दबाव आणखी वाढल्याचं, बाजारातील विश्लेषकांनी सांगितलं. 

हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी रोज ९० हजार गाठी कापूस विकत होते. एक कापूस गाठ १७० किलोची रुईची असते. आता शेतकरी रोज १२० लाख गाठी कापसाची विक्री करत आहेत. तर या महिन्याच्या शेवटी २ लाख गाठींवर बाजारातील आवक पोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी कापूस का रोखला?

गुजरातमधील शेतकऱ्यांनी जवळपास ७५ टक्के कापसाचा स्टाॅक केल्याचंही व्यापारी सांगतात. तसंच महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनीही कापूस मागे ठेवला.

एरवी कमी उत्पादन आणि आर्थिक तंगी असलेले शेतकरी मार्च महिन्यापर्यंत कापूस विकतात. यंदाही त्यामुळं ऑक्टोबर ते मार्च या काळात कापसाचा भाव हंगामातील निचांकी पातळीवर असतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी सध्या कापूस रोखून धरला आहे.

कसं आहे शेतकऱ्यांचं कापूस विक्रीचं नियोजन

मार्चनंतर बाजारातील आवक कमी होऊन दरही वाढलेला दिसतो. त्यामुळे कापसाचा साठा केलेले शेतकरी मार्च महिन्यानंतर कापसाची विक्री करण्याचे नियोजन करत आहेत. तसचं आर्थिक सक्षम आणि आर्थिक तंगी नसलेले शेतकरी जून महिन्यानंतरही कापूस विक्री करणार असल्याचे सांगत आहेत.

निर्यातीसाठी  मागणी

सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. त्यामुळे बांगलादेश आणि इतर देशांनी भारताकडून कापूस खरेदी वाढवली. मात्र कापसाचे भाव यापेक्षा आणखी कमी झाल्यास चीनही भारताकडून कापूस घेऊ शकतो, असेही व्यापाऱ्यांनी सांगितलं.

दरवाढीला पोषक स्थिती

चीनने अमेरिकेकडून कापूस खरेदी वाढवली. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे दर आणि वायद्यांमध्ये चढ उतार सुरु असले तरी दरपातळी टिकून आहे. त्यामुळं देशातील कापूस दरही जास्त दिवस दबावात राहणार नाहीत.

बाजारावरीलआवकेचा दबाव येऊन गेल्यानंतर आणि निर्यात वाढल्यानंतर कापूस दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com