
कोल्हापूर : परतीचा पाऊस (Heavy rainfall) जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या भागात पाऊस सुरू असल्याने नुकसान वाढत आहे. रोजच्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाने जिल्ह्यात गेले आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. शेतातील सोयाबीन मळणीची (Soybean Threshing)कामे ठप्प झाली होती.
पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने सोयाबीन कापणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मजुरांची कमतरता असल्याने खंडित काम घेण्यावर मजुरांचा कल वाढला आहे.
पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकरी जादा पैसे देऊन पीक काढणी करून घेत आहेत. मजुरांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत मजुरीचे दर वाढवले आहेत. सोयाबीन कापणी, मळणीसाठी एकरी पाच हजार रुपये दर आकारला जात आहे.
त्याचबरोबर शेतात चिखल असल्याने सर्व पीक बाहेर काढावे लागत असल्याने वाहतूक खर्च वेगळा घेतला जात आहे. तसेच मळणीसाठी मशिन मालक एका पोत्यासाठी चारशे ते पाचशे रुपये दर घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.