Vegetable Cultivation : शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल

जव्हार, जि. पालघर : तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक साधने आणि सुधारित वाणाचे बी-बियाणे यांचा वापर करून या भागातील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळायला लागला आहे.
Vegetable Cultivation
Vegetable CultivationAgrowon

जव्हार, जि. पालघर : तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान (Modern Agriculture Technology) वापरून अत्याधुनिक साधने आणि सुधारित वाणाचे बी-बियाणे (See) यांचा वापर करून या भागातील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे (Vegetable Cultivation) वळायला लागला आहे. कमी वेळ, कमी कष्टात जास्त नफा देणारी पिके असल्याने भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे.

Vegetable Cultivation
Vegetable Market Rate : गत आठवड्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर

जव्हार तालुक्यात भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता तालुक्यातील शेतकरी भाजीपाल्यासह वालाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ही लागवड करणाऱ्या भागात नांगरणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे. तालुक्यातील वनवासी, पिंपळशेत, खरोंडा, बाळ कापरा, हाडे, साकूर आदी भागांत भाजीपाला लागवड होते.

Vegetable Cultivation
Vegetables : हिरव्या वांग्याची जाग्यावरच काटापट्टी

त्यात वाल, चवळी, तूर, हरभरा अशा पिकांची तसेच कारली, मिरची, वांगी, टोमॅटो, अशा भाजीपाल्याची लागवड शेतकरी करत आहेत. ही लागवड करताना शेतकरी तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील सामाजिक संस्थांच्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करत आहेत. यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घेत आहेत.

तासाभरात भाजी संपते

जव्हार शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत ग्रामीण भागातून स्वच्छ आणि ताजा भाजीपाला दाखल होत असून अवघ्या तासाभरात भाजीपाला संपतो, असे शेतकरी सचिन गावंडा, देविदास पवार यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com