
Tomato Rate : देशातील अनेक राज्यात टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याने सध्या टोमॅटोची जोरदार चर्चा सुरू आहे. पुढचे दोन महिने टोमॅटोच्या दरात अशीच वाढ राहण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने तातडीने नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला टोमॅटो खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. हे टोमॅटो खरेदी करून दरन नियंत्रणात आणण्याबाबत सरकार पावले उचलत आहे. दरम्यान या निर्णयावर किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी भूमिका मांडत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी डॉ. नवले यावेळी म्हणाले की, टोमॅटोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता कुठे दोन रुपये जास्त मिळत आहेत. परंतु या सरकारला शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळत आहेत हे बघवत नाही. सरकार यापूर्वी कधीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलं तर त्यांना खड्ड्यात घालण्याचं काम सरकार करत आहे. केंद्र सरकार टोमॅटो खरेदी करून सामान्य शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याचे तीव्र नाराजी नवले म्हणाले.
सध्या बाजारात टोमॅटोचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वस्तात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांद्याची खरेदी करणार आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी विपरीत परिस्थिती शेतकऱ्यांवर आली होती.
त्यावेळी सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावसं वाटलं नसल्याचे अजित नवले म्हणाले. टोमॅटो अधिक उत्पादीत झाल्यामुळं टोमॅटोचे दर उतरले होते. याकाळात टोमॅटोचा चिखल रस्त्यावर झाला होता. शेतकरी टमॅटो काढून रस्त्याच्या कडेला फेूकून देत होते असे अजित नवले म्हणाले.
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. आपली शहरी वोट बँक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा सातत्याने बळी दिला जात आहे. आपल्या संकुचित राजकारणासाठी भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून राज्यात सर्वच शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. शेतकऱ्यांना आपला कांदा ७०० ते ८०० रुपये क्विंटल दराने विकावा लागला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यासह सर्वच शेतीमालाचे भाव हस्तक्षेप करुन पाडण्यात आले आहेत.
दूध दरावरूनही नवले आक्रमक
राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघ आणि कंपन्यांनी दुधाचे खरेदी दर एक महिन्यात ८ रुपयांनी पाडले आहेत. दुधाला ३५ रुपये दर देण्याच्या सरकारच्या निर्देशाला कंपन्यांनी कचऱ्याची पेटी दाखवूनही सरकार तेथे मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत.
शेतकऱ्यांवरील संकटात गप्प बसणारे भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार टोमॅटोला दोन रुपये मिळू लागताच शेतकऱ्यांच्या विरोधात मात्र लगेच सक्रिय झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचा किसान सभा निषेध करत आहे. सरकारने आपले शेतकरीविरोधी हस्तक्षेप थांबवावेत आणि शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.