Paddy Plantation : शेतकरी सहकुटुंब गुंतले भातलावणीत

Kharif Season 2023 : भातलावणीची कामे पूर्ण कशी होणार, या चिंतेत शेतकरी अदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजुरांबाबत विचारणा करीत आहेत. मात्र अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Updated on

Pali News : जिल्ह्यात दिलासादायक पर्जन्यवृष्टी झाल्याने बळिराजा सुखावला आहे. सध्या भात रोपे तरारली असून शेतकरी भात लावणीच्या कामात गुंतले आहेत. परंतु कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शिवाय मजुरीही वाढल्‍याने कुटुंबातील सर्वच सदस्य तसेच शहरात गेलेले चाकरमानी खास भातलावणीसाठी गावात दाखल झाले आहेत.

Paddy
Paddy Farming : किनाऱ्यावरील हजारो एकर भातशेती पाण्याखाली

भातलावणीची कामे पूर्ण कशी होणार, या चिंतेत शेतकरी अदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजुरांबाबत विचारणा करीत आहेत. मात्र अनेक आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे.

तर ज्याच्याकडे बैल जोडी नाही त्यांना दुसऱ्याच्या भरवशावर लावणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्‍यामुळे अनेकांनी आपले मित्र परिवार, आप्तस्‍वकीयांना भातलावणीसाठी बोलावले आहे. शहरातील राहणारे चाकरमानीही मुलाबाळांसह भातलावणीत सहभागी होताना दिसतात.

Paddy
Paddy Crop Damage : सिंधुदुर्गात ३०० हेक्टरवरील भातपिकाला अतिवृष्टीचा फटका

सहकुटुंब भातलावणीची मजा

शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा जणू एक स्नेह मेळावा किंवा हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत आनंद सोहळाच असतो. घरातल्या स्‍त्रिया सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहरी करतात. सकाळी लवकर कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक आटोपून त्यांच्या मदतीला जातात.

या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची पारंपरिक गाणी, ओव्या म्हणून भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतात,आणि कधी कधी गाण्याचीही साथ देतात. दुपारच्या जेवणानंतरही सूर्यास्तापर्यंत भातलावणी केली जाते. बच्चेकंपनी सुद्धा भात लावणीत हातभार लावताना दिसते.

पावसाळ्यात शेतमजुरी करणाऱ्या बहुतांश आदिवासी बांधव अन्य कामासाठी स्थलांतरित झाल्यामुळे शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. शिवाय मजुरीही वाढली आहे. त्यामुळे नातेवाईक व कुटुंबीयांना घेऊन भात लावणी करावी लागत आहे. पण ही मजा काही औरच आहे.
- योगेश शिंदे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com