Bogus Fertilizer : बनावट खत विक्री उघड

Fertilizer Market : किनवट तालुक्यातील मोहपूर रोडवर एका चारचाकी वाहनात नागपूर येथील कंपनीचे ‘ॲग्रोमॅक्स’ नावाचे बनावट खत शेतकऱ्यांना विक्री करत असल्याचा प्रकार शनिवारी (ता. ३) दुपारी एक वाजता उघडकीस आला.
Bogus Fertilizer
Bogus FertilizerAgrowon
Published on
Updated on

Nanded News : किनवट तालुक्यातील मोहपूर रोडवर एका चारचाकी वाहनात नागपूर येथील कंपनीचे ‘ॲग्रोमॅक्स’ नावाचे बनावट खत शेतकऱ्यांना विक्री करत असल्याचा प्रकार शनिवारी (ता. ३) दुपारी एक वाजता उघडकीस आला.

कृषी विभागाने या गोरखधंद्यांचा पर्दाफाश करत चारचाकी वाहनासह २१ खताच्या बॅगा असा एकूण १३ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करून किनवट पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

किनवट तालुक्यातील मोहपूर येथे एका चारचाकी वाहनामध्ये बनावट खत आणून ते शेतकऱ्यांना विना पावती देता विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली.

Bogus Fertilizer
Fertilizer Market : शेतकऱ्यांवर खतांच्या वाहतूक खर्चाचा भार

या बाबत किनवट उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर यांनी कृषी पर्यवेक्षक डी. जी. भालेवाड, कृषी सहायक सी. एस. दासरवार, एच. डी. शेवाळे यांच्यासमोर समवेत घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनामध्ये (क्रमांक एम.एच. २९ बीई ३९५६) एनजीपी ॲग्रोटेक १५५, महादेवनगर, पारडी (जि. नागपूर) या कंपनीचे ॲग्रोमॅक्स या खताच्या २१ बॅगा आढळून आल्या.

Bogus Fertilizer
Fertilizer Selling Center : कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असल्याचे लिहून आले होते. या बॅगावर १३९९ किंमत होती. तसेच एक्सपायरी डेट तीन वर्षे असल्याचे नमूद होते. या बनावट खताच्या बॅगा शेतकऱ्यांना विक्री करण्यात येत होत्या. या खताचा पंचनामा विभागीय तंत्र अधिकारी प्रवीण भोर, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी बी. बी. गिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

खत विक्रीसाठी आलेले तसलीमोद्दीन सलीमोद्दीन काजी (रा. उमरखेड जि. यवतमाळ), नितीन रमेश नरवाडे (रा. बारा ता. उमरखेड जि. यवतमाळ) हे दोन व्यक्ती आढळून आल्या. या दोघांना खत विक्री बाबत विक्री परवाना, उगम प्रमाणपत्र तसेच कंपनीच्या जबाबदार व्यक्तीचे नाव व इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता त्यांनी विक्री परवाना नसल्याचे सांगितले. या प्रकरणी किनवट पोलिसात कंपनीसह दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com