Nagar News : लाखो भाविक वारकरी वर्षानुवर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. प्रशासनाची मदत मिळो अथवा न मिळो, दिंडी सुरूच राहणार आहे. मात्र शासन आणि प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. त्या जाणिवेतूनच नगर जिल्ह्यातून आषाढीला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन अहमदनगर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आवश्यक ती मदत आणि संपर्क करण्यासाठी प्रशासनाने ‘पंढरीची वारी, शासन आपल्या द्वारी’ ही वॉर रूम तयार केली आहे. वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी, या भावनेतून हे नियोजन केले आहे. पुण्यातील दिंडीच्या धर्तीवर हे नियोजन केल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच, पंढरी वारीसाठी जाणाऱ्या दिंडीप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन पालकमंत्री विखे यांच्या पुढाकारात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याबाहेरील २७, तर जिल्ह्यातील २६० दिंड्या आषाढीला जातात
महिलांना अंघोळीसाठी तंबू उभारले जाणार
दिंडीतील सर्व वाहनांना टोलमाफी
सुविधांसाठी २४ तास नियंत्रण कक्ष (९४२०९१९०७७)
लोणंद, फलटण पालखी तळाची मंत्री विखे यांच्याकडून पाहणी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ता. १८ ते २३ जून २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून, या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
मंत्री विखे पाटील यांनी लोणंद पालखीतळ व फलटण पालखी तळाची पालखी वारीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपस्थित होते.
पालखी मुक्कामस्थळाच्या पाहणीवेळी श्री. विखे पाटील म्हणाले, की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्य पालखीच्या सोबत नोंदणीकृत दिंड्या असाव्यात व त्यानंतर नोंदणी नाहीत अशा इतर दिंड्यांचा समावेश करावा म्हणजे प्रशासनाला सोयीसुविधांचे नियोजन करताना सोयीचे होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.