APMC Income : पाच बाजार समित्यांत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

परभणी ः जिल्ह्यातील ११ पैकी जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा, ताडकळस बाजार समित्यांमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला आहे.
APMC
APMCAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील ११ पैकी जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा, ताडकळस बाजार समित्यांमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा (APMC Income) खर्च अधिक झाला आहे.

त्यामुळे या बाजार समित्या तोट्यात (APMC In Loss) आहेत. उर्वरित सहा बाजार समित्यांचा वाढाव्या (नफा) नुसार अनुक्रमे मानवत, सेलू, परभणी, बोरी, गंगाखेड, सोनपेठ असा क्रम आहे.

उत्पन्न, खर्च, वाढावा, तुट, आस्थापना खर्च, वर्ग अहवालानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ११ बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न १६ कोटी २० लाख १२ हजार २८३ रुपये आहे. खर्च १५ कोटी ७४ लाख ५२ हजार १८६ रुपये आहे.

तर वाढावा (नफा) १ कोटी ६६ लाख २३ हजार ९६३ रुपये तर तूट १ कोटी २० लाख ६३ हजार ८६६ रुपये आहे. आस्थापना खर्च १० कोटी ६८ लाख ९१ हजार ६५० रुपये आहे.

APMC
Kolhapur Apmc Election : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीसाठी विक्रमी ७९३ अर्ज

उत्पन्नानुसार जिल्ह्यात ‘अ’ वर्ग परभणी, जिंतूर, सेलू, मानवत या ४ बाजार समित्या आहेत. ‘ब’ वर्ग बाजार समित्यांत पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा या ४ बाजार समित्या तर ‘क’ वर्ग मध्ये बोरी, ताडकळस बाजार समित्या आहेत. ‘ड’ वर्ग मध्ये पालम ही एकमेव बाजार समिती आहे. ११ पैकी ७ बाजार समित्या अंतर्गत १४ उपबाजार आहेत.

APMC
Mahagaon APMC Election : महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

शेतीमाल आवक घटल्याने अडचणी

शेतीमालाची आवक कमी झाल्यामुळे अनेक बाजार समित्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह अन्य खर्चासाठी अडचणी येत आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईतील या बाजार समित्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नांची गरज आहे.

२०२१-२२ बाजार समितीनिहाय स्थिती (कोटी रुपयांत)

बाजार समिती...उत्पन्न...खर्च...वाढवा...तूट...आस्थापना खर्च...वर्गवारी

परभणी...२.८७६७...२.७१४९...०.१६१८...०००...१.९४२०...अ

सेलू...३.३७९८...२.८५५१...०.५२४७...०००...१.७४९०...अ

मानवत...३.६४३०...२.७५८९...०.८८४०...०००...२.१३४७...अ

सोनपेठ...०.६८७९...०.६७०२...०.१७७...०००...०.५१७...ब

गंगाखेड...०.९७९७....०.९४३०...०.३६७...०००...०.५९८४...ब

बोरी...०.४६७६...०.४३०३...०.३७३...०००...०.३६२...क

जिंतूर...२.४४२६...२.६१६५...०००...०.१७३९..१.४९९७...अ

पाथरी...०.८२२९...१.०५५२...०००...०.२३२३...०.५४५५...ब

पालम...०.१५३८...०.३९१४...०००...०.२३७...०.३३१...ड

पूर्णा...०.५३०४...१.०६६२...०००...०.५३५८...०.८८२२...ब

ताडकळस....०.२१६३...०.२४२९...०००...०.२६५....०.२२६५...क

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com