Kolhapur Apmc Election : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीसाठी विक्रमी ७९३ अर्ज

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी १४० अर्ज दाखल झाले. एकूण उमेदवारी अर्जांची संख्या २१७ झाली आहे.
Kolhapur Apmc Election
Kolhapur Apmc ElectionAgrowon

Kolhapur Election News : कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. ३) अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तब्बल ४६८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज भरल्यानंतर आता पॅनेल तयार करण्यासाठी पक्षप्रमुखांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

काही उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन व उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांमुळे बाजार समिती निवडणूक कार्यालय गर्दीने गजबजून गेले. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ५) तर या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

काँग्रेस वगळता अन्य राजकीय पक्षांच्या पातळीवर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत सोमवारी (ता. ३) शेवटच्या दिवसापर्यंत संभ्रम कायम होता. निवडणुकीत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, त्यातील आपल्या पक्षाला सुसंगत असे उमेदवार आपल्या कवेत घेण्यासाठी या राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू होतील.

या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, व्यापारी अडते व माथाडी कामगार यांचे पदाधिकारी सभासद तसेच शेतकरी यांचे मतदान ग्राह्य मानले जाते.

Kolhapur Apmc Election
Kolhapur Zilha Parishad : कोल्हापुर ‘झेडपी’चा बुधवारी अर्थसंकल्प

तसेच उमेदवारीही याच पाच गटांतून आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ७९३ अर्ज दाखल झाले.

त्यात विकास सोसायटी गटातून ३३१, ग्रामपंचायत गटातून १४९, अनुसुचित जाती गटातून ४२, अडते व्यापारी गटातून २९ अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून ३८ अर्ज, तर माथाडी कामगार गटातून १६, महिला प्रतिनिधी गटातून ६२, इतर मागासवर्गीय गटातून ९६, विमुक्त जाती गटातून ३० अर्ज दाखल झाले.

गडहिंग्लजसाठी १४० अर्ज

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी १४० अर्ज दाखल झाले. एकूण उमेदवारी अर्जांची संख्या २१७ झाली आहे. सकाळपासूनच इच्छुकांची पावले सहायक निबंधक कार्यालयाकडे वळली होती.

दुपारी बारानंतर गर्दी वाढत गेली. स्थानिक पातळीवरील नेते, इच्छुक उमेदवार, त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाचा आवार फुलून गेला होता.

Kolhapur Apmc Election
APMC Election : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी मोठी चुरस

गटनिहाय दाखल झालेले अर्ज : (कंसात एकूण अर्ज) विकास सेवा संस्था सर्वसाधारण ५५ (८८), महिला प्रतिनिधी ११ (१२), इतर मागासवर्गीय ७ (१३), विमुक्त जाती, भटक्या जमाती ७ (१४), ग्रामपंचायत सर्वसाधारण ३९ (६२), अनुसूचित जाती जमाती ८ (११), आर्थिक दुर्बल ७ (८), अडते व व्यापारी ३ (५), हमाल व मापाडी ३ (४).

जयसिंगपूरसाठी ११५ अर्ज दाखल

जयसिंगपूर बाजार समितीसाठी सोमवारी (ता. ३) ९९ अर्ज दाखल झाले. तर ३१ मार्च रोजी १६ अर्ज दाखल झाले होते. एकूणच ११५ उमेदवारांचे अर्ज बाजार समितीसाठी दाखल झाले.

सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिरोळ येथील सहायक निबंधक कार्यालयात झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशी विकास संस्था गटाच्या ११ जागांपैकी सर्वसाधारण ७ जागांसाठी ४८, महिला २ जागांसाठी ८, भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती १ जागेसाठी ५, ओबीसी १ जागेसाठी ५, ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण २ जागांसाठी १७, अर्थिक दुर्बल १ जागेसाठी ४, अनुसूचित जाती १ जागेसाठी ७, अडते व्यापारी २ जागांसाठी ४ आणि हमाल तोलाईदार १ जागेसाठी १ अर्ज असे एकूण ९९ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सर्वच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या ११५ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com