Custard Apple
Custard Apple Agrowon

Sitaphal Sangh : पुरंदर तालुका सीताफळ संघाची कार्यकारिणी जाहीर

पुरंदर तालुका सीताफळ संघाची बैठक सासवड येथील शरद भवन येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पुढील ३ वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
Published on

Pune News : पुरंदर तालुका सीताफळ संघाची (Sitaphal Sangh) बैठक सासवड येथील शरद भवन येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पुढील ३ वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी संघाच्या अध्यक्षपदी नीलेश काळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून संतोष म्हस्के यांची, तर सचिव म्हणून महेश लवांडे यांची निवड करण्यात आली आहे.

Custard Apple
Pune News : खडी मशिन विरोधात उतरले पुरंदर तालुक्यातील आठ गावे

बैठकीला महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा सीताफळ संघाचे उपाध्यक्ष शांताराम पोमण, महाराष्ट्र राज्य सीताफळ संघाचे सदस्य माउली मेमाणे, तात्यासाहेब काळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

Custard Apple
Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपसा जलसिंचनाच्या पाण्याच्या दरात वाढ नाही

पुरंदर तालुक्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० एकर क्षेत्र सीताफळासाठी उपलब्ध आहे. यातील पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ५०० एकर क्षेत्रावर रसायनयुक्त खत, मुक्तशेती करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला.

पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र स्थापन झाल्यास यश मिळेल, असा विश्‍वास मंगेश लवांडे यांनी व्यक्त केला.

पुरंदर तालुका सिताफळ संघाची कार्यकारिणी खालीलप्रमाणे

अध्यक्ष : नीलेश काळे, उपाध्यक्ष : संतोष म्हस्के, सचिव : महेश लवांडे, कार्यकारिणी सदस्य : संतोष जाधव, राजेंद्र गायकवाड, शरद दळवी, बाळासाहेब दाभाडे, विकास खटाटे, विजय कोंढाळकर, शरद शिवरकर, विठ्ठल कुंजीर, सतीश शिंदे, बाप्पू काळे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com