Excise Department : उत्पादन शुल्क विभागाला मिळणार अद्ययावत कार्यालय

जीर्ण झालेल्या कार्यालयाच्या जागी नवीन कार्यालय बांधण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ वर्षापासून पाठपुरावा केला. अखेर प्रयत्नांना यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Excise Department Alibaug
Excise Department AlibaugAgrowon

अलिबाग ः जीर्ण झालेल्या कार्यालयाच्या जागी नवीन कार्यालय बांधण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Department Of Excise) आठ वर्षापासून पाठपुरावा केला. अखेर प्रयत्नांना यश आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Work Department) प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अलिबागमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या कार्यालयाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागाला हक्काचे कार्यालय मिळणार आहे.

Excise Department Alibaug
Turmeric Crop Management : हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन् उपाय

राज्यामध्ये महसूलवाढीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक आहे. दारूविक्रीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल या यंत्रणेमार्फत सरकारला मिळतो; परंतु अलिबाग येथील विभागाचे अधीक्षक कार्यालय जीर्णावस्‍थेत आहेत. नवीन कार्यालयाचा आराखडा तयार करून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता; परंतु या कार्यालयाची जागा शासनाच्या नावावर असल्याने हे काम लांबणीवर गेले. त्यानंतर जिल्हा प्रशासन, महसूल विभागाच्या पुढाकाराने कार्यालयाची जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नावावर करण्यात आली. त्‍यानंतर पुन्हा आराखडा तयार करून प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला.

Excise Department Alibaug
Traditional Agriculture : पैशांअभावी पारंपरिक शेतीपद्धतीवरच गुजराण

बांधकाम विभागाने प्रस्तावाला मान्यता दिल्‍यावर तो अंतिम मंजुरीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगडचे अधीक्षक यांचे कार्यालय, अलिबागमधील निरीक्षक भरारी पथकाचे कार्यालय, कर्मचाऱ्यांचे कार्यालय, गोदाम व वाहनतळ आदी सुविधा असतील. ७८० चौरम मीटरमध्ये दुमजली इमारत उभारण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाची जागा ‘शासकीय’ नावाने होती. जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने ही जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. नवीन इमारतीचा प्रस्‍ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय उभे राहण्याची शक्यता आहे.
कीर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यावर कार्यालयाच्या कामाची लवकरच सुरुवात केली जाईल.
जे. ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, अलिबाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com