Flood : वर्धा नदीच्या पुरामुळे अकरा गावांना पुराचा वेढा

वणी तालुक्यातील ११ गावांना पुराचा वेढा पडला आहे. लगतच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतून वाहणारी वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी या गावांमध्ये घुसले आहे.
Flood
Flood Agrowon

यवतमाळ : वणी तालुक्यातील ११ गावांना पुराचा (Flood In Vani) वेढा पडला आहे. लगतच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतून वाहणारी वर्धा नदीला (Wardha River Flood) आलेल्या पुराचे पाणी या गावांमध्ये घुसले आहे. सर्व नागरिक सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. झोला व कोणा गावचे सुमारे एक हजार नागरिकांना वणी आयटीआय येथे त्यांचे पशुधनासह स्थलांतरित करण्यात आले आहे.

Flood
‘पूर’ दारात आणि ‘रेषा’ अडकली पुण्यात

सध्या परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. गरज पडल्यात आवश्यक ती सर्व व्यवस्था करून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी नागरिकांना आश्‍वस्त केले आहे.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या ३ टीम तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची नागपूर इथून एक टीम येथे कार्यरत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक छोट्या बोटीने कोना गावातील एका सिकलसेल रुग्णाला वणी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील उकणी, जुनाड, शिवणी (ज), सेलू (खु), भूस्की, कवडशी, रांगणा, चिंचाली, सांवगी (नवीन), झोला, कोना गावांना पुराचा वेढा पडला आहे.

Flood
Flood : गडचिरोली वगळता विदर्भात पूर ओसरला

जिल्हाधिकारी यांनी रांगण येथून ड्रोन कॅमेराद्वारे ११ गावांतील पूर परिस्थिती पाहणी केली तसेच वनी आयटीआय येथे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलेल्या नागरिकांची देखील चर्चा केली. जीवितहानी वाचवण्याला प्राथमिकता देण्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले. शेती नुकसानीची भरपाई शासनाकडून लवकरच देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पुरातील प्रत्येक गावासाठी एक एक तलाठी मंडळ अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून, पुराच्या वेढ्या अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच स्थलांतरित नागरिकांसाठी जेवण व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना यंत्रणेला दिले आहेत.

या वेळी त्यांनी सेलू येथील सरपंच यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा करून गावातील नागरिकांच्या सुरक्षा बाबत विचारणा केली. काय आवश्यकता आहे का, घरात पाणी शिरले का, याबाबत विचारणा केली. पुरामुळे बंद झालेल्या वनी वरोरा रस्त्याची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. याप्रसंगी आमदार संजीव बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार निखिल धुरजड व संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com