Electricity : विजेचे संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले

नितांत गरज असताना शेतकऱ्यांना विजेअभावी शेतीला पाणी मिळत नाही. दर वर्षी रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच विजेसाठी शेतकऱ्यांची मोठी फरपट वीज वितरण कंपनीकडून केल्या जाते.
Electricity
ElectricityAgrowon

रिसोड, जि. वाशीम ः नितांत गरज असताना शेतकऱ्यांना विजेअभावी (Electricity) शेतीला पाणी (Agriculture Irrigation) मिळत नाही. दर वर्षी रब्बी हंगामाच्या (Rabi Season) सुरुवातीलाच विजेसाठी शेतकऱ्यांची मोठी फरपट वीज वितरण कंपनीकडून (Mahavitaran) केल्या जाते. मुबलक पाणी असूनही शेतीला पाणी देता येत नसल्यामुळे विजेचे संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुंजल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Electricity
Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे रहस्य

या वर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे रब्बीच्या सिंचनासाठी पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तालुक्यात या वर्षी जवळपास ५७ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड होणार आहे. तूर, कापूस व फळबाग पिकांनाही पाणी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे तसेच दिवसा वीजपुरवठा केल्या जात नसल्यामुळे आणि वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी कंबर कसली आहे.

Electricity
Electricity : आठ तासही सुरळीत वीज मिळेना

सर्वत्र रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी रब्बीच्या पेरण्या आटोपल्या आहेत. ओल्या शेतात मशागत केल्यामुळे त्या शेतांना पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु वीज उपकेंद्रावर वारंवार होत असलेला तांत्रिक बिघाड तसेच रोहित्रावर वाढलेला वीजभार या कारणामुळे नियमित वीजपुरवठा होत नसल्यामुळे तसेच भारनियमनामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

चार वर्षांपासून शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत

मागील तीन ते चार वर्षांपासून तालुक्यातील काही शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. भोकरखेड येथील मोतिराम पांडुरंग गवळी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये शेतात वीज मिळावी म्हणून कोटेशन भरले होते. कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या विधवा पत्नी मागील दोन वर्षांपासून वीजजोडणीसाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांना वीज जोडणी व मीटर मिळालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com