Grampanchayat  Election
Grampanchayat ElectionAgrowon

Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील १२८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला

परभणी ः ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील १२८ ग्रामपंचायतींचा निवडणूक (Grampanchayat Election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रविवारी (ता. १८ डिसेंबर) आवश्यक त्या ठिकाणी मतदान घेण्यात येईल तर मंगळवारी (ता. २० डिसेंबर) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

Grampanchayat  Election
Gram Panchayat Election : अकोल्यात २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे निवडणूक कार्यक्रम राबविण्यात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार ता. १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

Grampanchayat  Election
पावसासाठी El Nino आणि La Nina या दोन प्रक्रियाचं महत्त्व का आहे ? | ॲग्रोवन

सोमवार ता. २८ नोव्हेंबर ते शुक्रवार ता. २ डिसेंबर या कालवधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. सोमवारपासून ५ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. बुधवारी ता. ७ दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यक असल्यास रविवारी ता. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंयातींमध्ये परभणी तालुक्यातील २९ ग्रामपंचायती, जिंतूर तालुक्यातील ३३, सेलू तालुक्यातील ११, मानवत तालुक्यातील ८, पाथरी तालुक्यातील ७, सोनपेठ तालुक्यातील ३, गंगाखेड १३, पालम तालुक्यातील १३, पूर्णा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com