Eknath Shinde : एकनाथ शिंदेच राहणार मुख्यमंत्रिपदी ः बावनकुळे

Maharashtra Politics Update : या सरकारमध्ये मतभेद नाहीत की मनभेद नाहीत,’’ अशी स्पष्टोक्‍ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत आणि मुख्यमंत्रिपदीही तेच राहतील. बुधवारी (ता. ५) मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे नागपुरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केल्यानंतर ते परत मुंबईला गेले.

याचा संबंध नाराजीशी जोडण्यात काहीही अर्थ नाही. मंत्री उदय सामंत यांनीही यावर भाष्य केले. त्यामुळे या सरकारमध्ये मतभेद नाहीत की मनभेद नाहीत,’’ अशी स्पष्टोक्‍ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Eknath Shinde
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी बैलगाडी हाकत केला वेगळा प्रयोग; कृषीमंत्री नुसतं बघतच बसले

आज (ता. ६) सकाळी कोराडी येथील निवासस्थानी आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सध्या अजित पवारांनी जी भूमिका घेतली, ही महाराष्ट्रहिताची, देशहिताची आहे. बुधवारी छगन भुजबळ आणि इतरही नेत्यांनी सांगितले, की त्यांना हे पाऊल का उचलावे लागले. त्यावरून शरद पवारांचे राजकारण काय आहे, हे लक्षात येते.

अजित पवारांनी त्यांची आपबिती महाराष्ट्रातील जनतेपुढे मांडली. ‘सत्य परिस्थिती मांडताना मी महाराष्ट्राशी खोटं बोलणार नाही,’ असे ठासून सांगितले. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्‍वास ठेवेल.’’

‘‘सध्या निवडणुका नाहीत. त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्‍न आता नाही. समरजित घाडगे नाराज नाहीत. ते भाजपचे निष्ठावान नेते आहेत. कसाही प्रसंग आला तरीही ते पक्षापासून फारकत घेऊ शकत नाहीत.

Eknath Shinde
Eknath Shinde : आमचे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांचेच : मुख्यमंत्री शिंदे

उलट शरद पवारांच्या घरातच मनभेद झाले. अजित पवारांनी त्याचे दाखले दिले. शिवसेनेसोबत गेल्यामुळे पवारांचे नुकसानच झाले. आज तर अशी परिस्थिती आली की परिवारही त्यांच्यापासून दूर जात आहे. शरद पवारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आधी त्यांनी आपले घर सांभाळावे’’, असे बावनकुळे म्हणाले.

‘शरद पवारांनी परिवारालाही सोडले नाही’

‘‘अजित पवारांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आलेख मांडला. जीवन चरित्र मांडले. त्यावरून वाटते की शरद पवारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे स्वतः अजित पवार, पक्ष आणि शरद पवारही वेळोवेळी अडचणीत आले. राजकारणात परिवार तरी सोडायला पाहिजे. पण शरद पवारांनी राजकारणात आपल्या परिवारालाही सोडले नाही’’, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com