Team Agrowon
शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत राज्यात विविध योजनांचा लाभ गरजुपर्यंत पोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम घेतले जातायत. यामध्ये शेती अवजारे आणि यंत्रांची वाटप करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "राज्यातील नागरिकांना सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबवला जात आहे.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत यंत्र आणि अवजारांचं वाटप करण्यात येत आहे."
राज्यातील कृषी यांत्रिकीकरणाला गती देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास लाभार्थ्यांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.