Team Agrowon
संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
या पार्श्वभूमीवर देशात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविण्यात येत आहे.
जगात सर्वाधिक तृणधान्य पिकविणाऱ्या देशामध्ये भारताचा समावेश होतो.
तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी, राजगिरा आदी पिकांचे वर्गीकरण केले आहे.
तृणधान्याचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ जाहीर केला आहे
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्यांची पौष्टिकता पटवून देण्यासाठी शालेय विभाग विविध उपक्रम राबविणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आहारात तृणधान्याचा अधिकाधिक समावेश व्हावा म्हणून १ ते १४ ऑगस्ट, १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर तसेच १ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत