Sugarcane Nursery
Sugarcane NurseryAgrowon

Sugarcane Nursery : ऊस रोपवाटिकांचे अर्थकारण बिघडले

Sugarcane Seedling Demand : गेल्‍या वीस दिवसांपासून ऊस रोपवाटिकांकडे असणारी ऊस रोपांची मागणी ५० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
Published on

Kolhapur News : दुष्‍काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत असून याचा फटका शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांनाही बसत आहे. गेल्‍या वीस दिवसांपासून ऊस रोपवाटिकांकडे असणारी ऊस रोपांची मागणी ५० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी दिल्याने त्याचा विपरीत परिणाम आडसाली ऊस लागवडीवर झाला. पाण्याअभावी यंदा ऊस लागवडी संथ गतीने होत आहेत.

दुष्‍काळी परिस्थितीचे गांभीर्य वाढत असून याचा फटका शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांनाही बसत आहे. गेल्‍या वीस दिवसांपासून ऊस रोपवाटिकांकडे असणारी ऊस रोपांची मागणी ५० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी दिल्याने त्याचा विपरीत परिणाम आडसाली ऊस लागवडीवर झाला. पाण्याअभावी यंदा ऊस लागवडी संथ गतीने होत आहेत.

Sugarcane Nursery
Citrus Crop Nursery : रोपवाटिका अधिस्वीकृती शुल्कात कपातीऐवजी वाढ

पश्चिम महाराष्‍ट्रातील ऊस रोपवाटिकांमधून राज्‍यभर रोपांची मागणी असते. यंदा जुलैच्या पहिल्‍या पंधरवड्या‍पर्यंत पाऊस नसल्‍याने पावसाळ्यात होणाऱ्या लागवडीही रखडल्‍या. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने सुरवात केल्यानंतर थांबलेली रोपांची मागणी सुरु होती. साधारणपणे ऑगष्टच्या सुरवातीपर्यंत रोपांची थोडीफार मागणी होती.

Sugarcane Nursery
Onion Nursery : खानदेशात यंदा कमी कांदा रोपवाटिका

यानंतर मात्र त्यात घट होत गेली. अनेक रोपवाटिका चालकांनी मागणी वाढेल या आशेवर उसाची खरेदी मोठ्या प्रमाणात करून त्याची रोपे तयार करण्‍याला प्राधान्य दिले. पण अचानक मागणी घटल्याने रोपवाटिका चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह नांदेड, सोलापूर, नाशिक, पुणे भागांतील बागायती पट्ट्यातूनही ऊस रोपांना निरंतर मागणी असते. पण यंदा या भागातील स्थानिक पाणीपातळीतही घट झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड टाळली.

या महिन्यात चांगला पाऊस झाला तर ऑक्टोबरमध्ये उसरोपांना मागणी येऊ शकते, असा आशावाद रोपवाटिकाचालकांचा आहे. पण तोपर्यंत रोपांचे नियोजन करण्याचे आव्हान रोपवाटिकांपुढे आहे.

गुजरातमधून मागणीत घट

रोपवाटिका चालक राज्याबरोबरच कर्नाटक, गुजरातमध्येही रोपांची विक्री करतात. महाराष्‍ट्राबरोबर कर्नाटकातील मागणीही यंदा कमी होती. रोपवाटिका चालकांनी गुजरातला रोपे पाठवून महाराष्‍ट्र व कर्नाटकाचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये सप्टेंबरमध्ये फारशी मागणी नसल्याने आता गुजरात मधूनही मागणी थंडावली आहे. यामुळे येथून पुढे शिल्लक रोपांची विक्री करण्याचे मोठे आव्‍हान आहे.

गेल्‍या काही महिन्यांपासून उसाच्या किमतीतही वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडून वाणानुसार ३५०० ते ४५०० रुपये प्रतिटन या दराने उसाची खरेदी करावी लागत आहे. यातच ‘ट्रे’च्या किमतीही वधारल्या. एवढी धावपळ करूनही मागणी कमी असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
- प्रल्हाद पवार, रोपवाटिकाचालक, रा. जांबळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com