Rabi Sowing : रब्बीत एक लाखावर हेक्टरची ई-पीकपाहणी

परभणी जिल्ह्यात गतवर्षी (२०२१-२२) रब्बीतील २ लाख ७१ हजार १४२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५१ हजार ९११.५२ हेक्टर (१९.१५ टक्के) क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली होती.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात ३ लाख ४ हजार २३२.३८ हेक्टर पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. त्यापैकी शुक्रवार (ता. २७) पर्यंत ७९ हजार ८९० शेतकऱ्यांनी १ लाख १४ हजार ९७२.६० हेक्टर (३७.९१ टक्के) क्षेत्राची ई-पीकपाहणी (E Peek Pahani) पूर्ण केली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवार (ता. १९) ते शनिवार (ता. २१) या कालावधीत विशेष मोहीम राबविली त्यामुळे ई-पीकपाहणी क्षेत्र नोंदणीत वाढ झाली आहे. परंतु अद्याप रब्बीतील १ लाख ८९ हजार २५९.७५ हेक्टरची ई-पीकपाहणी शिल्लक आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : जिल्हाधिकाऱ्यांकडून फाळेगावला पीकपाहणी

शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीच्या महत्त्वाबाबत माहिती नसणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, सर्व्हर डाउनच्या समस्यांमुळे ई-पीकपाहणी अडखळत सुरू आहे.

याकामी अनेक तलाठ्यांना स्वारस्य नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे रब्बीतील १०० टक्के ई-पीकपाहणीचे उद्दिष्ट कोसोदूर आहे.

परभणी जिल्ह्यात गतवर्षी (२०२१-२२) रब्बीतील २ लाख ७१ हजार १४२ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ५१ हजार ९११.५२ हेक्टर (१९.१५ टक्के) क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली होती.

यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात बुधवार (ता. १८) पर्यंत ३ लाख ४ हजार २३२ पैकी ५५ हजार ७२६ हेक्टरची (१८.३२ टक्के) ई-पीकपाहणी झाली होती.

रब्बीच्या १०० टक्के पेरणी क्षेत्राची ई-पीकपाहणी करण्याची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन दिवस विशेष मोहीम राबविली.

त्यानंतर ई-पीकपाहणी केलेल्या शेतकरी खातेदारांची संख्या ७९ हजार ८९० एवढी, तर क्षेत्रात १ लाख १४ हजार ९७२.६० हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे.

एकूण ३६४.२६ हेक्टर पडीक क्षेत्र मिळून एकूण क्षेत्र १ लाख १५ हजार ३३६.८६ हेक्टर आहे.

E Peek Pahani
E- Peek Pahani : केज तालुक्यात ई-पीकपाहणी करण्यात ‘व्यत्यय’

ई-पीकपाहणीचे महत्त्व...

शेतकऱ्यांद्वारे मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणारी ही ई-पीकपाहणी नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येणार आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड योजनेतील धान्य खरेदी-विक्री नोंदणीसाठी आवश्यक आहे.

शेतातील जल सिंचनाच्या स्रोताची नोंद ७/१२ वर केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंप योजनेत अर्ज करणे सुलभ होते. बांधावरील झाडांची नोंद करण्याचीही सुविधा येथे उपलब्ध आहे.

रब्बी ई-पीकपाहणी स्थिती क्षेत्र (हेक्टरमध्ये) शुक्रवार ता. २७ पर्यंत

तालुका....पेरणी क्षेत्र...ई-पीकपाहणी क्षेत्र...शेतकरी संख्या...टक्केवारी

परभणी...५६६०१...२११६४...१३१८४...३७.४१

जिंतूर...७०००१...१७८४६...११६७८...२५.७१

सेलू...३१८३१...१३१५१...८७१८...४१.३५

मानवत...२००६९...११५३६...७४९२...५७.६७

पाथरी...१८२४८...६०६७...४०५८...३३.५२

सोनपेठ...१५८६४...९७२२...६९०७...६१.३७

गंगाखेड...३२५९०...१२७०२...९२८६...३९.१७

पालम...२११७१...७६०२...६२८०...३५.९७

पूर्णा...३७८५६...१५१७९...१२३१२...४०.१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com