P. M. Kisan Samman Nidhi : जिल्ह्यात ९१ हजार कुटुंबांची ई-केवायसी रखडलेलीच

पीएम किसान सन्मान योजना : चार लाख १८ हजार पात्र कुटुंब
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman NidhiAgrowon

नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सध्या पाच लाख १८ हजार ६६७ शेतकरी वार्षिक सहा हजार रुपये निधीसाठी पात्र ठरले आहेत. या सन्मान निधीचे हप्ते सुरळीत चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते. परंतु जिल्ह्यात ९१ हजार १७६ शेतकरी कुटुंबाची अद्याप ई-केवायसी रखडली आहे.

PM Kisan Sanman Nidhi
Pm Kisan Samman Nidhi Yojana : ई-केवायसी करा; अन्यथा किसान सन्मान विसरा

पीएम किसान योजनेतर्गत जिल्ह्यातील पाच लाख १८ हजार ६६७ पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लाभार्थी कुटुंबाची माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत सन्मान निधीतर्गत अकरा हप्त्यांत दोन हजार रुपयानुसार प्रतिवर्ष सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. पुढील हप्ते नियमित चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. या कालावधीत ६० हजार कुटुंबाने ई-केवायसीचे पूर्ण केले. परंतु अद्याप ९१ हजार १७५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan : नको म्हटलं, तरी पीएम किसान सन्मान निधी घ्याच.

तालुकानिहाय प्रलंबीत शेतकरी कुटुंब

अर्धापूर २,२२४, भोकर ४,९८९, बिलोली २,९९७, देगलूर ६,१९६, धर्माबाद २,६७५, हदगाव ८,९५९, हिमायतनगर ४,६३६, कंधार ९,५८३, किनवट ११,१७५, लोहा ८,१४१, माहूर ३,८२४, मुदखेड १,६७५, मुखेड ९,३४३, नायगाव ७,१६३, नांदेड ४,३८४, उमरी ३,५७४.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com