Pm Kisan Samman Nidhi Yojana : ई-केवायसी करा; अन्यथा किसान सन्मान विसरा

अचलपूरच्या तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman NidhiAgrowon

अचलपूर (जि. अमरावती) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (Pm Kisan Samman Nidhi Yojana) नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. ७) मुदतवाढ आहे. त्यानुसार आधार क्रमांकाला ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत. परिणामी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

PM Kisan Sanman Nidhi
PM kisan : राज्यभर ‘पीएम-किसान’ची ‘केवायसी’ पडताळणी सुरू

बहुतेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्याने आता ७ सप्टेंबर ही ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा १२ वा हप्ता मिळणार नाही. ई-केवायसी केली नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची यादी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व सरपंच यांना ई-मेलने पाठवण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपली ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्काळ आपल्या नजीकच्या सीएससी सेंटर, महा ई-सेवाकेंद्र तथा सेतू कार्यालय येथे संपर्क साधावा. त्याशिवाय केवायसी घरबसल्यासुद्धा करता येते. त्याकरिता शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी. त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी जे बँक खाते दिलेले आहे, त्यासोबत आपले आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे; जेणेकरून लाभ मिळण्यास मदत होईल. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना सन्मानचा लाभ मिळणार नाही. याकरिता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com