Nilwande Water Test : पाणी गळतीमुळे निळवंडेची पाणी चाचणी झाली बंद

Nilvande Water Project : त्रेपन्न वर्षे रेंगाळलेल्या निळवंडे प्रकल्पातून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडलेले पाणी अवघ्या त्रेपन्न तासांत बंद करावे लागले.
Nilwande Water Project
Nilwande Water ProjectAgrowon
Published on: 
Updated on: 

Nagar News : त्रेपन्न वर्षे रेंगाळलेल्या निळवंडे प्रकल्पातून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडलेले पाणी अवघ्या त्रेपन्न तासांत बंद करावे लागले. शेतात आणि घरात पाणी जाऊ लागल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली.

आमदार किरण लहामटे यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची बाजू घेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर चाचणी बंद करण्यात आली. आता या भागात सातशे मीटर अंतरात प्लॅस्टिकचा कागद अंथरून पुन्हा चाचणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Nilwande Water Project
Agriculture Irrigation Scheme : ‘कृषी सिंचन’करिता ३५० कोटींना मान्यता

धरणाच्या भिंतीपासून पहिल्या सात किलोमीटर अंतरातील मेहेंदुरी गावाजवळ डाव्या कालव्याला न थांबणारी गळती लागल्याने ही चाचणी बंद करण्याची नामुष्की ओढवली. गळतीमुळे अकोले तालुक्यातील शेतकरी संतापले तर पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहणारे लाभक्षेत्रातील दुष्काळी टापूतील शेतकरी हिरमुसले.

या भागात कालवा जमीन सपाटीपासून तब्बल चाळीस फूट उंच आहे. स्फोटकांच्या साहाय्याने डोंगर खोदून तो तयार करण्यात आला. त्यामुळे डोंगराच्या पोटात खोल भेगा पडल्या आहेत. कालव्यात सोडलेले हे पाणी या भेगांतून थेट सुमारे चाळीस फूट खाली असलेल्या शेतात आणि घरात जाऊ लागले. शुक्रवारी (ता. २) काही ठिकाणी कालव्याच्या पात्रात काळी माती टाकून हा पाझर थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Nilwande Water Project
Nilwande Dam : निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा आज शुभारंभ

मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ही गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी संतापले. आमचा कालव्यात पाणी सोडण्यास विरोध नाही. मात्र घरात आणि शेतात पाणी जाऊन नुकसान होणार असेल ते आम्ही कसे सहन करायचे, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

आमदार लहामटे तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर दुपारी दोनच्या सुमारास चाचणी बंद करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली.

आता या सातशे मीटर लांबीच्या गळतीच्या अंतरात कालव्याच्या पात्रात प्लॅस्टिक कागद अंथरून चाचणी पुन्हा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र डावा कालव्याच्या पंधरा ते सतरा आणि एकवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरातदेखील अशीच स्थिती आहे. त्यामुळे चाचणीच्या वेळी तेथील काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.