Fertilizer Use : अयोग्य खतवापराने नुकसानीची भरपाई मिळेना

Crop Damage : सरदार अॅग्रो फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स (मोरबी, गुजरात) या कंपनीच्या अयोग्य किंवा बोगस सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे जिल्ह्यातील एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Fertilizer Use
Fertilizer UseAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सरदार अॅग्रो फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स (मोरबी, गुजरात) या कंपनीच्या अयोग्य किंवा बोगस सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे जिल्ह्यातील एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांत विकृती आली असून, ती काढून फेकावी लागत आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल झाले, पण नुकसानीची भरपाई मिळालेली नाही.

आरोपींचे काय झाले, कृषी विभागाने याबाबत काय कार्यवाही केली, याबाबतही प्रशासन स्पष्टपणे सांगत नाही. जामनेर, पारोळा, अमळनेर, जळगाव आदी भागांत सरदार अॅग्रो फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्सच्या सुपर फॉस्फेट खताच्या वापराने पिकात हानी झाली. इतर कंपन्यांच्या सुपर फॉस्फेटपेक्षा या कंपनीचे खत कमी दरात मिळत होते. त्याच्या वापराने पीकहानी झाली. खताचे नमुने सदोष असल्याचा अहवालदेखील कृषी विभागाला संबंधित प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला.

Fertilizer Use
Fertilizer use: रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी पीकनुकसानीची पाहणीदेखील केली. पुढे लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार संबंधितांवर किंवा कंपनीचे संचालक, जिल्ह्यातील वितरक, विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. जळगाव शहरालगत कानळदा रस्त्यावरील पार्श्‍वनाथ अॅग्रोटेक या वितरकासह इतर दोन्ही विक्रेत्यांचे खत परवाने निलंबित झाले.

Fertilizer Use
Fertilizer Use : नत्रयुक्त खतांचा, बुरशीनाशकांचा फवारणीद्वारे वापर करावा

एवढी कारवाई झाली, पण पुढे काय, असा प्रश्‍न आहे. नुकतीच पातोंडा (ता. अमळनेर) येथील भरत पाटील व इतर (१ हेक्टर), राजेंद्र सूर्यवंशी (२ हेक्टर ४० आर), युवराज पाटील (९१ आर) यांना या खत वापरामुळे कापूस पिकात नुकसान सहन करावे लागले.

शेतातील कपाशीचे पीक उपटून फेकावे लागले. सरदार अॅग्रो चे खत निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळण्याअगोदरच शेतकऱ्यांकडून खताची पहिली मात्रा कापूस पिकाला देण्यात आली होती.

पिकाला खत दिल्यानंतर साधारण पंधरा ते एकवीस दिवसांनंतर त्याचे दुष्परिणाम पिकावर दिसून येऊ लागल्यावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता कापूस पीक वखरून नष्ट करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.

अमळनेरात चालढकल

अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अमळनेर व इतर भागांत सरदार अॅग्रो फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स कंपनीचे खत पिकांना दिल्याने झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी येत आहेत. पण अमळनेर पंचायत समिती येथील कृषी अधिकारी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नाही. अमळनेर येथे लेखी स्वरूपात तक्रार करून देखील संबंधित अधिकारी प्रत्यक्ष परिस्थितीचा पंचनामा करायला शेतावर यायला तयार नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com