Maharashtra Drought : ‘वरुणराजा पिकव माझं रान’

Drought Like Condition : ‘कित्येक खेटे घालावे लागतील मिळाया तुटपुंजे अनुदान, बरस मनसोक्त वरुणराजा पिकव माझं रान...’ अशा अनेक कविता समाजमाध्यमांवर सादर करत किसान पुत्रांनी आपल्या बापाची व्यथा समाजमाध्यमांवर मांडली आहे.
Drought
DroughtAgrowon

Nanded News : ‘कित्येक खेटे घालावे लागतील मिळाया तुटपुंजे अनुदान, बरस मनसोक्त वरुणराजा पिकव माझं रान...’ अशा अनेक कविता समाजमाध्यमांवर सादर करत किसान पुत्रांनी आपल्या बापाची व्यथा समाजमाध्यमांवर मांडली आहे.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ‘कोरडा दुष्काळ’ हा ट्रेंड चालविला आहे. हा ‘ट्रेंड’ सध्या व्हायरल होत असून, या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात सध्या पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिके वाळून जात आहेत. परिणामी, राज्यातील शेतकरी धास्तावले आहेत. यासाठी किसान पुत्रांनी समाज माध्यमांचा खुबीने वापर करत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ‘टॅग’ केले आहे.

Drought
Drought Condition : दुष्काळी भागांतील पाण्यासाठीच्या प्रकल्पांना केंद्राची मदत हवी

राज्यात यंदा जूनमध्ये पावसाने विलंब केल्यामुळे पेरण्याची कामे जुलैमध्ये झाली. यामुळे उडीद, मूग क्षेत्रांत लक्षणीय घट झाली. यानंतर झालेल्या पेरण्यामुळे पिकांच्या वाढीवेळी ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली.

काही भागांत तर एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका आदी पिके सुकली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली आहे.

Drought
Drought Conditions : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट उग्र होण्याची भीती ; जयंत पाटील यांचे राज्य सरकारला पत्र

पावसाची वाट बघून थकलेले शेतकरी आता धास्तावले आहेत. वर्षात एकदाच येणारे खरिपातील पीक हातचे गेल्यानंतर वर्षभराची गुजराण कशी करायची, याची भ्रांत त्यांना झोपू देत नाही. अशा परिस्थितीत वडिलांची होत असलेली व्यथा समाज माध्यमातून व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी किसान पुत्रांनी समाजमाध्यमांवर ‘कोरडा दुष्काळ’ हा ट्रेंड चालविला आहे.

‘भेगाळलेल्या मातीला हा कुठला शाप

पावसाची वाट पाहून थकलाय बाप

सुकतोय शिवार अन् चिमण्यांचा घास

बापाच्या गळ्याला दुष्काळाचा फास

पावसा गिधाडांच्या आधी त्याला तुझीच आस...’ अशी आर्त हाक किसानपुत्रांनी पावसाला दिली आहे.

कायम दुष्काळाच्या सावटातील मराठवाड्यात यंदा तर पावसाअभावी खरीप हातून गेल्यात जमा आहे. यामुळे याची धग शासनापर्यंत जावी, यासाठी हा ‘ट्रेंड’ सुरू केला आहे. यास मोठा प्रतिसाद लाभत आहे.
- संतोष गव्हाणे, किसान पुत्र, नांदेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com