Drought Conditions : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट उग्र होण्याची भीती ; जयंत पाटील यांचे राज्य सरकारला पत्र

Water Crisis in Maharashtra : पावसाने दडी मारल्यामुळे दाराशी दुष्काळाचे सावट आ वासून उभे आहे. अशा गंभीर परिस्थितीकडे सरकारने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
 Jayant Patil
Jayant PatilAgrowon
Published on
Updated on

Worst Condition of Maharashtra : राज्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासमोर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात राज्यात शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

 Jayant Patil
Jayant Patil : ‘दुष्काळ आपल्या दारी’ आल्याची जाणीव आहे का? ; जयंत पाटलांचा सरकारला सवाल

पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या २९ टक्के पाऊस ठरावीक ठिकाणी झाला आहे. सद्यःस्थितीत ३२९ महसुली मंडलांत पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे.

कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यांतील खरीप वाया गेला आहे. सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. तिथे सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे.

 Jayant Patil
War Room : दुष्काळ निवारणासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मंत्रालयात उभारली 'वॉर रुम'

एकंदरीत राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीकरिता, बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यावर केलेल्या खर्चाचा परतावा परत मिळेल का नाही अशी स्थिती आहे. खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून, चारा पिकांचे देखील नुकसान झाले आहे, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याचे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पावसाअभावी सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच या वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राज्यात आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे घडल्यास शेतकरी आत्महत्येसारखे संकट उग्र होऊ शकते. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करुन त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com