
सोलापूर ः वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Agricultural University) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (Drone) ‘ड्रोन जनजागृती कार्यक्रम’ घेण्यात आला. शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार, कृषी विद्यापीठाचे सहप्रमुख अन्वेषक डॉ. एम. जी. शिंदे, शासकीय कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जे. डी. जाधव, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर, माजी अधिष्ठाता डॉ. अजितकुमार देशपांडे, निलकंठ मोरे, जी. बी. बनगे, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिवा सौ. अनिता ढोबळे लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे, लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. नवनाथ गोसावी यावेळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. गोरंटीवार यांनी शेतीमध्ये ड्रोनचा वापर त्याचे फायदे आणि आव्हाने, ड्रोनचे वेगवेगळे प्रकार, फवारणीसाठी शेतीमध्ये ड्रोनचा वापर, फवारणीसाठी ड्रोन वापरताना लक्षात घ्यावयाचे घटक, शेतीमध्ये ड्रोन वापरण्यासाठी शासनाचे उपक्रम व शासनाकडून मिळत असलेले प्रोत्साहन याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.
तसेच शेतकऱ्यांना असलेल्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले. या वेळी तांत्रिक अधिकारी निलकंठ मोरे, जी. बी. बनगे यांनी लोकमंगल महाविद्यालयाच्या स्ट्रॉबेरी या फळ पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करून प्रात्यक्षिक करून दाखविले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.