Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : पुरेसा पाऊस, ओल झाल्याशिवाय पेरणी नको

Kharif Season update : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे.
Published on

Kharif Season In Nashik News : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस व शेतात पेरणीयोग्य ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये.

तसेच कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेत्याकडून व पक्क्या बिलातच खरेदी कराव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले.

Kharif Sowing
Kharif Season 2023 : बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?

खरीप हंगामासाठी यंदा जिल्ह्यासाठी ६.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी एसएसपी १४ हजार ४७० टन व संयुक्त खते ६८ हजार ४३१ टन असे एकूण युरिया, डीएपी, एमओपी व संयुक्त खतांची २.६० लाख टनांची मागणी नोंदविण्यात आली होती.

यापैकी शासनाकडून २.२३ लाख टन खत्तांचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. ९ जूनअखेर जिल्ह्यात युरिया खतांचा ३५ हजार ७९४ टन, डीएपी १७ हजार ७३१ टन, एमओपी एक हजार ६८९, १ लाख ३८ हजार १०७ टन खतसाठा आहे.

जिल्ह्याकरिता कापूस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांचे एकूण ७७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

जिल्हा, तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना

शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठा या दर्जेदार व योग्य दराने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मिळण्याकरिता जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक अशा एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास ७८२१०३२४०८ या क्रमांकावर तसेच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com