Nanded Election Update : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलचे १७ उमेदवार निवडून आले असून हमाल मापारी गटातून आपक्षाने बाजी मारली आहे.
नांदेड जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा करिष्मा कायम असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे.तर भारतीय जनता पक्ष व शिवसेने युतीच्या परिवर्तन पॅनेलचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे बारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व शिवसेनेचे दोन असे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत..या निवडणुकीत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भगवानराव आलेगावकर, श्यामराव पाटील टेकाळे, काँग्रेस सरचिटणीस संजय देशमुख लहानकर , गांधी पवार निलेश देशमुख नागोराव आढाव सत्यजित भोसले, निळकंठ मदने ज्ञानेश्वर राजेगोरे गायत्री गजानन कदम कमलबाई रंगनाथ वाघ आदी उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
कंटूर बाजार समितीवर ‘शेतकरी विकास’चे वर्चस्व
नायगाव तालुक्यातील कंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचे 17 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहे.
कंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला नऊ जागा व काँग्रेसला नऊ असे एकूण १८ जागेवर विजय मिळून शेतकरी विकास पॅनेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन्ही पक्षाचे मक्तेदारी राहील हे स्पष्ट झाले.
भोकर बाजार समितीवर कॉग्रेसचे वर्चस्व
भोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिरंगी लढतीत सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीत १८ जागा पैकी कॉग्रेस पक्षाने १५ जागेवर वर्चस्व प्रस्थापित करीत बहुमत सिद्ध केले आहे.
भाजपास तीन जागेवर समाधान मानावे लागले तर नव्याने शिरकाव केलेल्या बिआरएस पक्ष व शिवसेना ठाकरे गटाला मतदारांनी नाकारले आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात विजयऊत्सव साजरा केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.