Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांना धक्का

महाविकास आघाडीने सरशी करत भाजपाला या निवडणुकीत धक्का दिल्याचे मानला जात आहे. मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का बसला.
Nagar APMC Election
Nagar APMC ElectionAgrowon

Nashik APMC Election जिल्ह्यात १२ बाजार समित्यांसाठी २९ हजार ८०९ मतदारांपैकी शुक्रवारी (ता. २८) दुपारी ४ वाजेपर्यंत २८ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९६.९० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात निवडणुकीत सुरस निर्माण झाली होती. यामध्ये महाविकास आघाडीने सरशी करत भाजपाला या निवडणुकीत धक्का दिल्याचे मानला जात आहे.

मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी आपली ताकद या वेळी सिद्ध केली. तर लासलगाव येथे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल पराभूत झाला आहे.

जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. यातील दिंडोरी, सिन्नर, कळवण, देवळा आणि घोटी बाजार समित्यांची मतमोजणी सायंकाळी उशिराने झाली.

दिंडोरी बाजार समितीत गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने १८ पैकी ११ जागांवर मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. तर माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्या शेतकरी उत्कर्ष पॅनेलला अवघ्या पाच जागा मिळाल्या.

Nagar APMC Election
APMC Election In Marathwada : मराठवाड्यात अनेक प्रस्थापितांना धोबीपछाड

सिन्नरमध्ये आमदार कोकाटे व माजी आमदार वाजे, उदय सांगळे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यात दोन्ही पॅनेलला समसमान नऊ जागांवर विजय मिळाला. कळवण येथे आमदार नितीन पवार व माजी सभापती धनंजय पवार यांनी १८ पैकी १५ जागा जिंकत गड शाबूत ठेवला.

माजी आमदार जे. पी. गावित, माजी सभापती रवींद्र देवरे यांच्या पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. घोटी बाजार समितीत माजी आमदार शिवराम झोले, ॲड. संदीप गुळवे, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने यांनी नेतृत्वाखालील पॅनेलने विरुद्ध शेतकरी परिवर्तनाच्या पॅनेलचा धुव्वा उडवत १६ जागांवर विजय मिळवला.

Nagar APMC Election
APMC Election Result : मंचरला १८ पैकी १७ जागा महाविकास आघाडीला

येवला येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पुन्हा करिष्मा कायम राहिल्याने विरोधी पॅनेल निष्प्रभ ठरले. भुजबळांच्या पॅनेलला १३ जागा मिळाल्याने एकतर्फी सत्ता कायम राहिली. मात्र भुजबळांच्या पॅनेलला पाच जागा गमवाव्या लागल्या.

प्रतिस्पर्धी शेतकरी समर्थक पॅनेलला ३ व अपक्षांना २ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे भुजबळांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीवरील सत्तेची हटट्रिकदेखील पूर्ण झाली आहे.

लासलगावमध्ये राष्ट्रवादीच्या पंढरीनाथ थोरे व भाजपचे डी. के. जगताप यांच्या पॅनेलला नऊ तर भुजबळ यांच्या पॅनेलला आठ जागा मिळाल्या. एक अपक्ष विजयी झाला.

स्वतःच्या मतदार संघातील निवडणूक असल्याने भुजबळ यांनी ती प्रतिष्ठेची केली होती. मात्र थोरे यांनीच वेगळी चूल मांडण्याचा फटका भुजबळांना बसला. त्यामुळे मतदार संघात भुजबळांची एकीकडे सरशी तर दुसरीकडे धक्का अशी स्थिती आहे.

Nagar APMC Election
APMC Election Maharashtra : बाजार समित्यांवर ‘मविआ’चे वर्चस्व!

पिंपळगाव बाजार समितीमध्ये सत्ता राखण्यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यशस्वी झाले. या निवडणुकीत बनकर यांच्या पॅनेलला ११ तर विरोधातील शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या. यतीन कदम हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.

चांदवड बाजार समितीत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या पॅनेलला १०, डॉ. कुंभार्डे यांना ७ तर १ अपक्ष असा निकाल लागला आहे. येथे भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

अत्यंत चुरशीच्या व विरोधकांनी तयार केलेल्या दहशतीच्या वातावरणातील नाशिक बाजार समितीची निवडणूक अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी जिंकली.

पिंगळे यांच्या आपले पॅनेलला बारा तर शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी पॅनेलला सहा जागा मिळाल्या. त्यामुळे पिंगळे यांनी बाजार समितीतील आपली वीस वर्षांची सत्ता अबाधीत ठेवली.

पालकमंत्री भुसे यांच्या पॅनेलचा मालेगावात पराभव

मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर मात केली. शिंदे गटाला हा जबर धक्का मानला जातो.भुसे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.

१८ जागापैकी हिरे गटाने १४ जागा जिंकल्याने भुसे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. भुसे यांना अवघी एक जागा मिळाली आहे. या निकालाचा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भुसे विरोधकांना उत्साहवर्धक ठरेल.

मतमोजणी दरम्यान धक्काबुक्की

पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीदरम्यान मतमोजणी वेळी रिकाऊटिंगच्या मुद्द्यावरून माजी आमदार अनिल कदम व यतीन कदम यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.

अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम आमनेसामने आले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागला. मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com