Department Of Revenue
Department Of RevenueAgrowon

Revenue Record : महसूल नोंदी प्रलंबित ठेवू नका ः प्रांताधिकारी कोडोलकर

महसूल विभागांतर्गत नोंदणीकृत व अनोंदणीकृत, साध्या नोंदी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी व विवादग्रस्त नोंद तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत.
Published on

मंचर ः ‘‘महसूल विभागांतर्गत (Revenue Department) नोंदणीकृत व अनोंदणीकृत, साध्या नोंदी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी व विवादग्रस्त नोंद तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत. याबाबत सक्त सूचना मंडल अधिकारी (Circle Officer) व कामगार तलाठी यांना दिल्या आहेत,’’ असे आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर यांनी सांगितले.

Department Of Revenue
Revenue Department : फेरफार अदालतीत जिल्ह्यात २ हजार ६८५ नोंदी निकाली

मंचर (ता.आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय महाराजस्व अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमा जोशी, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, निवासी नायब तहसीलदार ए. बी. गवारी, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, सचिन वाघ, दामुराजे असवले उपस्थित होते.

याप्रसंगी एकात्मिक बालविकास, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, पोलिस, भूमी अभिलेख, महसूल, पंचायत समिती, उपप्रादेशिक परीवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण कंपनी, मंचर नगरपंचायत, वनविभाग, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, गॅस एजन्सी,पेट्रोल पंप, पुरवठा विभाग व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाविषयी व नवनवीन आमलात येणाऱ्या योजना विषयी माहिती दिली. यावेळी लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com