Revenue Department : फेरफार अदालतीत जिल्ह्यात २ हजार ६८५ नोंदी निकाली

राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.
Modification Court
Modification CourtAgrowon
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या फेरफार अदालतीमध्ये एका दिवसात २ हजार ६८५ नोंदी निकाली काढण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

Modification Court
Pune Ring Road : रिंगरोडला मावळ, मुळशीत ‘वेग’

राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

त्या अनुषंगाने ई- फेरफार (E-Pherphar) प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी निर्देश दिले आहेत.

फेरफार अदालतीस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून, या फेरफार अदालतीमध्ये साध्या २ हजार ८६, वारसाच्या ४६४, तक्रारींच्या १३५ अशा एकूण २ हजार ६८५ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये हवेली ३१८, पुणे शहर १६, पिंपरी-चिंचवड ७८, शिरूर २१४, आंबेगाव १४१, जुन्नर २६१, बारामती ४९९, इंदापूर १७७, मावळ १४१, मुळशी ८३, भोर ५१, वेल्हा ७१, दौंड १००, पुरंदर २०४, खेड ३३१ अशा फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या, अशी माहिती कुळकायदा शाखेचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com