Fertilizer Reserve Stock : नांदेड जिल्ह्यात राखीव साठ्यातील १८८१ टन खताचे वितरण

Nanded Fertilizer Distribution : खरीप पिकांसाठी दुसऱ्या हप्त्यात देण्यात येणारा युरिया, तसेच डीएपी खताचा राखीवसाठा प्रशासनाने जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वितरित केला आहे.
Fertilizer stock
Fertilizer stockAgrowon
Published on
Updated on

Nanded News : खरीप पिकांसाठी दुसऱ्या हप्त्यात देण्यात येणारा युरिया, तसेच डीएपी खताचा राखीवसाठा प्रशासनाने जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वितरित केला आहे. यात डीएपी १००१ टन, तर युरिया ८८० टनांचा समावेश, असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Fertilizer stock
Linkage of Fertilizers : नगर जिल्ह्यात युरियासोबत अन्य खतांचे लिंकिंग

जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून सर्वाधिक डीएपी आणि युरिया खताची मागणी असते. अनेक वेळा डीएपी, युरिया खते बाजारात मिळत नाहीत. मागणी लक्षात घेता काही विक्रेते अधिक दराने खतविक्री करतात. जिल्ह्यात सध्या खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.

Fertilizer stock
Urea Fertilizer : नांदेड जिल्ह्यात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध

पिकांना नत्राचा दुसरा हप्ता देण्यासाठी शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बाजारात युरिया उपलब्ध झाला नाही तर तो अधिकच्या दराने विक्री होण्याची शक्यता असते. तसेच अनेक पिकांना संयुक्त खतात डीएपीचा वापर अधिक प्रमाणात होतो.

यामुळे डीएपी तसेच युरियाचा राखीव साठा प्रशासनाला दरवर्षी करावा लागतो. यंदाही कृषी विभाग जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून युरिया, डीएपी खताचा राखीव साठा (बफर स्टॉक) केला आहे. हा साठा बुधवारी (ता. १९) कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वितरित केला आहे. यासाठी कृषी विभागाने तालुकानिहाय नियोजन करून शेतकऱ्यांना खताचा पुरवठा व्हावा, यासाठी वितरण केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com