Onion Rate : कांदाप्रश्‍नी शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची ठिणगी

राज्यात सर्वत्र लेट खरीप कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या खाली मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे.
Onion Rate
Onion Rate Agrowon

Onion Market Update नाशिक : राज्यात सर्वत्र लेट खरीप कांद्याचे दर (Onion Rate) उत्पादन खर्चाच्या (Onion Production Cost) खाली मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी कांद्याचे लिलाव (Onion Auction) बंद पाडून पाच ते सहा ठिकाणी आंदोलने झाली.

त्यानंतर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेता केंद्र सरकारने लाल कांद्याची ‘नाफेड’मार्फत खरेदी सुरू केली. मात्र होणारी खरेदी आणि मिळणारा दर याबाबत खूपच अस्पष्टता असल्याने शेतकऱ्यांमध्ये वातावरण चिघळत आहेत. त्यामुळे कांदा प्रश्‍नावर नाशिक जिल्हा पेटला आहे.

Onion Rate
Onion Rate : कांद्याला आज, १ मार्चला राज्यातील बाजारात काय दर मिळाला?

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली. लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता. २७) २०० रुपयांनी सरासरी दर घसरल्याने शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रातच लिलाव बंद पाडले. त्यांनतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेत शिष्टाई केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Onion Rate
Onion Rate : आठ क्विंटल कांदा विक्रीतून उरला केवळ एक रुपया

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २८) विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी नाफेड खरेदीची माहिती दिली. त्यावर शेतकऱ्यांनी मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. खरेदी कुठे होत आहे, त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.

पुन्हा आंदोलनाची हाक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री काहीही घोषणा करीत असले. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार शिरीष कोतवाल गावोगावी जाऊन कांदा दरप्रश्‍नी शेतकऱ्यांच्या सभा घेत आहेत. शासनाच्या निषेधार्थ ३ मार्चला चांदवड बाजार समिती आवारात आंदोलन पुकारले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com