राज्यातील राजकारण वीट आणणारे ः तुपकर

‘‘सध्याच्या किळसवाण्या राजकारणामुळे सर्वांचेच नुकसान होत आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पेरण्या अडचणीत सापडलेल्या आहेत.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon

अकोला ः ‘‘सध्या राज्यात जे काही राजकारण (Maharashtra Politics) खेळले जात आहे, ते वीट आणणारे आहे. तरुणांनी या राजकारण्यांकडून काय आदर्श घ्यावा, राजकारण नगरपालिका, ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या स्तरावर पोहोचले. सरकार जर जाणार असेल तर जाता-जाता तत्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Farmer Loan Waive) करावी. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे टाकावेत,’’ अशा विविध मागण्या ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केल्या आहेत.

तुपकर म्हणाले, की राज्य सरकार जर पडणार असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची वीजबिल माफी करावी, पेरणीसाठी मोफत खते, बियाणे द्यावेत. पीककर्जाचा तत्काळ अध्यादेश काढावा. हे सर्व निर्णय रातोरात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. यातून शेतकऱ्यांचीही चिंता दूर होईल. नेत्यांनाही शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.

‘‘सध्याच्या किळसवाण्या राजकारणामुळे सर्वांचेच नुकसान होत आहे. पाऊस पुरेसा नसल्याने पेरण्या अडचणीत सापडलेल्या आहेत. काहींनी पेरले ते उगवले नाही. दुबार पेरणीचेही संकट आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस चिंता वाढवणारा उगवतोय. खते, बी-बियाणे महागडे खरेदी करून जमिनीत टाकली. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे धाडसी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे,’’ असेही तुपकर यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com