Radhanagari Dam : ‘राधानगरी, कोयनासह ‘वारणा’तून विसर्ग सुरूच

Kolhapur Rain Update : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे.
Radhanagari Dam
Radhanagari DamAgrowon

Kolhapur News : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग सुरूच आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पायथा वीजगृहातून विर्सगात वाढ करून तो २१०० क्युसेक केला आहे.

तर सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत कोयना ९७, नवजा १६३ व महाबळेश्‍वरमध्ये १२४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातून मंगळवारपासून पायथा वीजगृहातून विसर्ग वाढवला आहे. तर धोम धरणातूनही सोमवारी (ता. ३१) धोम धरणातून ३४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

Radhanagari Dam
Kolhapur Radhanagari Dam : कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे दरवाजे बंद पण पंचंगंगेच्या पाणी पातळीत वाढ

धोम- बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. धरणामध्ये १८०० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी ८१०.३१ मीटर झाली आहे. निर्धारित मंजूर जलाशय पाणीपातळी शेड्यूलनुसार पाणीपातळी राखण्यासाठी बलकवडी धरणातून ९०० क्युसेक चालू असलेला विसर्ग वाढवून १८०० क्युसेक केला आहे.

Radhanagari Dam
Koyna Dam : कोयनेसह अलमट्टीचा विसर्ग वाढविला

सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र वारणा धरणात गेल्या चोवीस तासांत ५७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातून ५९७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

अधून मधून हलका पाऊस पडला. कऱ्हाड येथील कृष्णा नदीची पाणीपातळी १३.९, ताकारी येथे १५.७, भिलवडी येथे १३.०८, तर सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी १२.६ फूट इतकी आहे. अलमट्टी धरणातून ५७ हजार क्युसेकने पाणी सोडले आहे.

कोल्हापुरातील २३ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात १५.३ मिलिमीटर पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा येथे झाला. पावसाचा जोर कमी असला, तरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील अद्यापही २३ बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित ३, ५ व ६ या दरवाज्यातून ५६८४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सातरा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्‍वर, जावळी तालुक्यांत पाऊस सुरू आहे. इतर तालुक्यांत मात्र उघडीप आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात पाऊस झाला. इतर तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com